ADVERTISEMENT

इथून धक्का…’ गाण्याची गायिका प्राजक्ता शुक्रे बिग बॉस मराठी ६ मध्ये; कोण आहे प्राजक्ता शुक्रे?

big boss marathi 6 prajakta shukre entry : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये Prajakta Shukre हिचा प्रवेश लक्षवेधी ठरत आहे. इंडियन आयडॉलपासून सुपरहिट गाण्यांपर्यंतचा तिचा प्रवास आणि आता बिग बॉसच्या घरातील खेळ प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.
big boss marathi 6 prajakta shukre entry

big boss marathi 6 prajakta shukre entry : बिग बॉस मराठीच्या बहुप्रतिक्षित सहाव्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली असून पहिल्याच आठवड्यात घरात रंगत वाढताना दिसत आहे. कलाकार, रील स्टार, युट्यूबर, डान्सर आणि विविध क्षेत्रांतील ओळखीची नावं यंदा बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहेत. एकूण १७ स्पर्धकांसह सुरू झालेल्या या सीझनमध्ये राकेश बापट, करण सोनावणे, सागर कारंडे, दीपाली सय्यद यांच्यासोबत Prajakta Shukre हिचाही सहभाग आहे.

घाऱ्या डोळ्यांची, गोड आवाजाची Prajakta Shukre ही अनेक वर्षांपासून संगीतप्रेमींच्या ओळखीची आहे. मात्र बिग बॉसच्या घरात तिची एंट्री होताच काही प्रेक्षकांना तिची नव्याने ओळख होत आहे. प्राजक्ताचा संगीतप्रवास आजचा नाही. ती ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सीझनमधील स्पर्धक होती. त्या सीझनमध्ये अभिजीत सावंत विजेता ठरला होता आणि त्याच सीझनमधून Prajakta Shukre नेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

इंडियन आयडॉलनंतर प्राजक्ताने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये अनेक गाणी गायली. तिचा आवाज वेगळा आणि लक्षात राहणारा असल्यामुळे तिची गाणी लवकर लोकप्रिय झाली. विशेषतः “इथून धक्का, तिथून धक्का देतोस काय रे” हे गाणं आजही सोशल मीडियावर चर्चेत असतं. तब्बल ११ वर्षांपूर्वी गायलेल्या या गाण्यामुळेच Prajakta Shukre ला ‘धक्का गर्ल’ ही ओळख मिळाली.

याशिवाय कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटातील ‘डंकिला’ हे गाणंही प्रचंड गाजलं होतं. या गाण्यामागचा आवाज Prajakta Shukre चाच होता, हे अनेकांना आजही आठवतं. तसंच तिने ‘वल्हव रे नाखवा’ हे जुने लोकप्रिय मराठी गाणं नव्या अंदाजात रिक्रिएट केलं होतं. या गाण्याला युट्यूबवर मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले असून तिच्या आवाजाची लोकप्रियता यामुळे आणखी वाढली.

हे पण वाचा.. गश्मीर महाजनी पुन्हा छोट्या पडद्यावर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या हिंदी आवृत्तीत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार अभिनेता

आता Prajakta Shukre बिग बॉस मराठीच्या घरात कसा खेळ खेळणार, ती तिच्या स्वभावामुळे आणि स्पष्ट मतांमुळे किती काळ टिकणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. शांत स्वभावाची कलाकार ते टास्कमध्ये आक्रमक भूमिका, असा तिचा प्रवास पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी Prajakta Shukre बिग बॉस मराठी ६ मध्येही तितकाच प्रभाव पाडणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हे पण वाचा.. सावली आई होणार का? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत मोठा भावनिक ट्विस्ट

big boss marathi 6 prajakta shukre entry