ADVERTISEMENT

“लोक काय म्हणतील याची भीती होती…” भूमिजा पाटील हिने सांगितल लग्न मोडण्यामागच खर कारण!

bhumija patil wedding breakup reveal : ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम Bhumija Patil हिने लग्न मोडल्याबद्दल प्रथमच भाष्य केलं आहे. बहिणींसोबतच्या मुलाखतीत तिने आयुष्यातील कठीण निर्णय घेतल्याचं सांगितलं.
bhumija patil wedding breakup reveal

bhumija patil wedding breakup reveal : मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री Bhumija Patil पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली भूमिजा आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. नुकत्याच दिलेल्या एका खास मुलाखतीत तिने तिचं लग्न मोडल्याचं स्पष्ट केलं आहे.

भाऊबीजच्या निमित्ताने राजश्री मराठीशी संवाद साधताना भूमिजाने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी मनमोकळेपणाने बोलताना सांगितलं की, “सगळ्यांना माहिती आहे की माझा साखरपुडा झाला होता आणि लग्न लवकर होणार होतं. काहींना तर वाटतं की माझं लग्न झालंय, पण तसं नाही. काही कारणांमुळे आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.”

हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, असं ती पुढे सांगते. “हा माझ्या आयुष्यातील एक मोठा आणि कठीण निर्णय होता. मला भीती वाटत होती की लोक काय म्हणतील. पण, जेव्हा स्वतःच्या मनाला त्रास होतो तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. मला जाणवलं की मी चुकीच्या दिशेने चालले आहे, त्यामुळे स्वतःसाठी योग्य ते पाऊल उचलणं गरजेचं होतं.”

भूमिजाने सांगितलं की, या कठीण काळात तिच्या बहिणी नेहमी तिच्यासोबत होत्या. “मी फक्त माझ्या बहिणींना सगळं सांगितलं. त्यांनी मला विचारलं — तू ठाम आहेस का? तुला यातून त्रास होणार नाही ना? त्यांनी माझ्यावर दबाव आणला नाही, उलट त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्या नेहमी माझ्या आनंदाला प्राधान्य देतात,” असं ती हसत म्हणाली.

तिने पुढे सांगितलं की, “त्या क्षणी सगळं मोडलं असलं तरी माझं कुटुंब माझ्या सोबत आहे, हीच माझी खरी ताकद आहे.”

हे पण वाचा.. मालिकेच्या सेटवर झाली ओळख, १२ वर्षांचं अंतर मिटवत विजय आंदळकर आणि रुपाली झणकरची हटके प्रेमकहाणी

Bhumija Patil च्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘झी मराठी’वरील ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सरस्वती ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. याशिवाय तिने ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘माझी माणसं’ या मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. सध्या ती ‘७ बेलवलकर’ या नाटकात रंगभूमीवर सक्रिय आहे.

तिच्या या प्रांजळ स्वीकृतीमुळे अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. आयुष्यातील कठीण प्रसंगानंतरही आत्मविश्वासाने पुढे जाणारी ही अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेरणादायी ठरली आहे.

हे पण वाचा.. “तू अभिनय नको करू”, चेतना भटचा संघर्ष ऐकून थक्क झाले चाहते; अभिनेत्री भावुक होत म्हणाली…

bhumija patil wedding breakup reveal