ADVERTISEMENT

ते पाहून वडील फक्त रडत होते…” भाऊ कदम यांनी सांगितला हृदयस्पर्शी किस्सा, म्हणाले – आज ते असते तर…

bhau kadam father memory emotional story : विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनी त्यांच्या कारकिर्दीतील एक भावुक प्रसंग उलगडला आहे. प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात वडिलांच्या डोळ्यांत आलेले अश्रू आजही त्यांच्या आठवणीत कायम आहेत.
bhau kadam father memory emotional story

bhau kadam father memory emotional story : आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे भाऊ कदम हे आज मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक मान्यवर नाव आहे. मात्र, या यशामागे संघर्ष, मेहनत आणि भावनांचा मोठा प्रवास दडलेला आहे. अलीकडेच त्यांनी आपल्या आयुष्यातील एक हृदयस्पर्शी आठवण शेअर केली, जी त्यांच्या चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ठरली.

भाऊ कदम सांगतात की, लहानपणापासूनच त्यांना आपल्या वडिलांचं कौतुक ऐकायचं होतं. “प्रत्येक मुलाला वाटतं की वडिलांनी कधीतरी आपल्याकडे पाहून अभिमानाने हसावं,” असं ते म्हणतात. पण त्यांच्या आयुष्यात हा क्षण यायला वेळ लागला. अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींमुळे त्यांनी नोकरीचा विचार केला होता. त्याच काळात दिग्दर्शक विजय निकम यांनी त्यांना नाटकासाठी विचारलं, पण तेव्हा त्यांनी नाटक करायचं टाळलं. मात्र नियतीनेच जणू त्यांना पुन्हा रंगभूमीकडे नेलं.

निकम यांनी त्यांच्या कुटुंबीयांना समजावून सांगितलं आणि शेवटी भाऊ कदम यांनी नाटक स्वीकारलं. काही दिवसांनी नोकरीचा कॉल आला, पण त्यांनी ती संधी नाकारली. “कदाचित रंगभूमी मला बोलावत होती,” असं ते प्रेमाने म्हणतात. त्यानंतर ‘मी एक डाव भुताचा’, ‘यदा कदाचित’ आणि नंतर ‘एवढंच ना’ या नाटकांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली.

भाऊ कदम सांगतात, “‘एवढंच ना’च्या एका प्रयोगाला माझे वडील आले होते. प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात हसत होते, माझं कौतुक होत होतं… आणि ते पाहून वडील फक्त रडत होते.” त्या क्षणाबद्दल बोलताना भाऊ कदम भावूक होतात. “त्यांना कायम काळजी वाटायची – माझं पुढे काय होईल? पण त्या दिवशी माझं कौतुक होताना पाहून त्यांना आनंदाश्रू आले. दुर्दैवाने आज ते नाहीत, पण त्यांचा तो क्षण माझ्या आयुष्यात कायम कोरला गेला आहे,” असे ते म्हणतात.

हे पण वाचा.. सोहम बांदेकरच्या लग्नाचा जल्लोष सुरू! ‘ठरलं तर मग’च्या कलाकारांसह पार पडलं पहिलं केळवण, पारंपरिक जेवणाची खास मजा

आज भाऊ कदम हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील सर्वात आवडते कलाकार आहेत, पण त्यांच्या मते, वडिलांच्या त्या अभिमानाच्या नजरेसारखा आनंद दुसरा नाही.

हे पण वाचा.. शेवटचा सीन.. अशोक सराफ यांच्या ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून संयमीची एक्झिट; म्हणाली