ADVERTISEMENT

भाग्यश्री मोटेचं स्वप्न पूर्ण! मायानगरी मुंबईत घेतलं हक्काचं घर; म्हणाली, “१४ वर्षांपूर्वी सुरू झाला होता हा प्रवास”

bhagyashree mote new home in mumbai : अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचं दीर्घकाळाचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तिने मायानगरी मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून या खास क्षणाचे फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
bhagyashree mote new home in mumbai

bhagyashree mote new home in mumbai : मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्यासाठी २०२५ हे वर्ष आयुष्यातील अविस्मरणीय ठरलं आहे. अनेक वर्षांच्या कष्ट, संघर्ष आणि स्वप्नांच्या प्रवासानंतर अखेर तिने मायानगरी मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या गृहप्रवेशाने भाग्यश्रीसाठी एक नवीन पर्व सुरू झालं आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या भाग्यश्री मोटे हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन घरातील फोटो आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. फोटोमध्ये तिने पारंपरिक पोशाख परिधान केला असून, पूजा-विधी करताना तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत आहे. तिच्या या खास क्षणात घरातील सदस्य आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.

या पोस्टमध्ये भाग्यश्रीने आपल्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून दिली आहे. तिने लिहिलं आहे की, “सुमारे १४ वर्षांपूर्वी जेव्हा मी अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकलं, तेव्हा मुंबई माझ्यासाठी फक्त एक स्वप्न होतं. तेव्हा राहायला जागा नसल्यामुळे दररोज पुण्यावरून मुंबईत येऊन ऑडिशन्स देऊन परत जायचं व्हायचं. पण आज त्या स्वप्ननगरीत माझं स्वतःचं घर झालं आहे.”

भाग्यश्रीच्या या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या आणि सहकलाकारांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. तिच्या या यशाबद्दल सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री अनुजा साठे, प्रियांका तेंडोलकर आणि अभिनेता गंधार खरपुडीकर यांच्यानंतर आता भाग्यश्री मोटेनेही हक्काचं घर घेऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.

भाग्यश्रीने आपल्या पोस्टमध्ये आईची आठवणही काढली आहे. “बाळ, तू आज असतीस तर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला असता. पण मला ठाऊक आहे की तू तिथेही माझा अभिमान बाळगत असशील,” असं ती भावनिक शब्दांत म्हणाली.

हे पण वाचा.. Premachi Goshta 2 : सतीश राजवाडे यांची प्रेमाची दुसरी कहाणी – हलकीफुलकी, पण मनाला भिडणारी

‘देवों के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात ओळख मिळवणाऱ्या भाग्यश्री मोटे ने आपल्या मेहनतीच्या जोरावर आज स्वप्नपूर्ती साध्य केली आहे. तिच्या या नव्या प्रवासासाठी चाहते आणि सहकलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

या दिवाळीत भाग्यश्री मोटेचं हक्काचं घर हे केवळ एका अभिनेत्रीचं स्वप्नपूर्तीचं प्रतीक नाही, तर मेहनत आणि चिकाटीने मिळवलेल्या यशाचं सुंदर उदाहरण आहे.

हे पण वाचा.. “माझ्याबरोबर लग्न करशील का?” चाहतीच्या प्रश्नावर गश्मीर महाजनीचं मनमोकळं उत्तर; म्हणाला…

bhagyashree mote new home in mumbai