लोकप्रिय अभिनेत्री Bhagyashree Mote ने तिच्या मोडलेल्या साखरपुड्याबाबत खुलासा केला आहे. विजय पलांडे यांच्यासोबतचं नातं तुटल्यानंतर तिने लग्न आणि नातेसंबंधांबद्दलचा स्वतःचा दृष्टिकोन व्यक्त केला.
Bhagyashree Mote चं मोडलेल्या साखरपुड्यावर स्पष्ट वक्तव्य
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Bhagyashree Mote हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने मत मांडत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 2022 साली मेकअप आर्टिस्ट विजय पलांडे यांच्यासोबत तिचा साखरपुडा झाला होता. या समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अनेकांनी त्याला लग्न समजत शुभेच्छा दिल्या, पण काही महिन्यांतच या नात्यात दुरावा आला आणि साखरपुडा मोडल्याची बातमी तिनेच पोस्टद्वारे दिली.
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत Bhagyashree Mote म्हणाली, “लोकांना आजही असं वाटतं की माझं लग्न झालं होतं. कारण त्या सेलिब्रेशनमध्ये पूजेचं आयोजन होतं आणि साडीतील माझा लूक पाहून लोकांना लग्न समजलं. पण खरं सांगायचं झालं तर ती फक्त एंगेजमेंट होती, जी पुढे तुटली.”
Bhagyashree Mote पुढे नातेसंबंधांबद्दल सांगताना म्हटले, “मी अजूनही प्रेमावर विश्वास ठेवते. मला भविष्यकाळात मुलं हवी आहेत. माझ्या बहिणीची मुलं पाहून मला खूप आनंद होतो. पण सध्या मी योग्य जोडीदाराच्या शोधात आहे. एकदा तो योग्य साथीदार मिळाला कीच मी पुढील पाऊल उचलणार.”
भाग्यश्रीने तिच्या मोडलेल्या साखरपुड्याचा दोष कुणालाही न देता सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे. ती म्हणते, “दररोज तुम्हाला तुमच्या नात्याचा विचार करावा लागतो. काही प्रसंग हे नशिबावर अवलंबून असतात. माझा स्वभावच असा नाही की मी कुणाला दोष देईन. जे घडलं ते घडलं, पण आता माझं लक्ष कामावर आहे.”
हे पण वाचा..Mukta Barve :सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाली-आमच्यातलं भांडण संपलं…”
Bhagyashree Mote ने मराठी, हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांतही आपली छाप सोडली आहे. “कांदळ गव्हाची शेती,” “जुंड,” आणि इतर चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या स्पष्ट बोलण्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.









