avika gor lagn national tv anupam kher mahesh bhatt ashirvad : टीव्हीवरच्या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री avika gor सध्या चर्चेत आली आहे. ‘बालिका वधू’ मालिकेतील आनंदी ही भूमिका तिला घराघरात प्रसिद्ध करून गेली. आता हीच लाडकी अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असून, खास गोष्ट म्हणजे तिचं लग्न प्रेक्षकांना थेट नॅशनल टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच अविका गौर आणि तिचा जीवनसाथी मिलिंद चंदवानी यांनी साखरपुडा केला. या दोघांनी ‘पती पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्येही एकत्र झळकले होते. त्या शोदरम्यानच त्यांनी एंगेजमेंटची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता मात्र अविकाने स्वतः सांगितलं की ती थेट टीव्हीवरच लग्न करणार आहे. म्हणजेच तिच्या आनंदसोहळ्याचा साक्षीदार संपूर्ण देश होणार आहे.
एका मुलाखतीत बोलताना avika gor म्हणाली, “आजही मला कधी कधी विश्वास बसत नाही की हे खरोखर घडतंय. सकाळी उठल्यावर स्वतःलाच आठवण करून द्यावी लागते की हे स्वप्न नाही, वास्तव आहे. मला मिलिंदसारखा जोडीदार मिळाला यासाठी मी खूप भाग्यवान आहे. तो मला फक्त साथ देत नाही तर आयुष्यात पुढे जाण्याची ताकदही देतो.”
अविकाने पुढे सांगितलं की, “मी लहानपणी दोन गोष्टी बोलायचे. एकतर माझं लग्न कोर्ट मॅरेज होईल ज्याची कुणालाही कल्पनाही नसेल किंवा मग माझं लग्न असं असेल जे सगळा देश पाहील. आज माझं ते स्वप्न खरं होतंय. प्रेक्षकांनी मला २००८ पासून भरभरून प्रेम दिलं आहे, त्यामुळे माझ्या या खास क्षणी ते सहभागी होणं मला खूप महत्त्वाचं वाटतं.”
अविकाच्या लग्नाचं निमंत्रणपत्रिका जेव्हा पहिल्यांदा सेटवर दाखवलं गेलं तेव्हा तिची आई भावुक झाली होती. अजून अधिकृत पत्रिका वितरण सुरु झालेलं नसून, सर्वात आधी ते सिद्धिविनायकाच्या चरणी ठेवून आशीर्वाद घेणार असल्याचं अविकाने सांगितलं.
हे पण वाचा.. सूरज चव्हाणच्या ड्रीम होमची पहिली झलक; बहिण अंकिता वालावलकरने शेअर केला खास व्हिडिओ
या लग्नाला अनेक सेलिब्रिटींचे शुभेच्छा मिळाल्या आहेत. अनुपम खेर, महेश भट्ट आणि नागार्जुन यांसारख्या दिग्गज कलाकारांनी तिला आशीर्वाद दिला आहे. तर भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, अली गोनी आणि जन्नत जुबैर यांसारखे कलाकार व्यस्त शेड्यूलमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नसले तरी त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवले आहेत.
अविका गौरचं हे लग्न केवळ तिच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात ठरणार नाही, तर तिच्या चाहत्यांसाठीही अविस्मरणीय क्षण घेऊन येणार आहे.
हे पण वाचा..“‘बिग बॉस’मधून सुरु झालेली लव्हस्टोरी… आता लेकीच्या वाढदिवसाने रंगली राहुल–दिशाची दुनिया,पाहा खास फोटो”









