ashok saraf nivedita saraf together in serial : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक मोठी खुशखबर चर्चेत आली आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांपैकी असलेले अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीने एक पोस्ट शेअर करत “महाराष्ट्राची आवडती जोडी तुम्हाला भेटायला येतेय” असं म्हटलं होतं. त्या वेळी या जोडीचं नाव उघड करण्यात आलं नव्हतं, परंतु प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये अंदाज लावला होता की ती जोडी दुसरी-तिसरी नाही तर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचीच असणार. आणि आता तो अंदाज खरा ठरला आहे.
‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘अशोक मा.मा.’मध्ये निवेदिता सराफ यांची एंट्री होत असून त्या आपल्या पती अशोक सराफ यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. याच मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे आणि तो सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.
या प्रोमोमध्ये निवेदिता सराफ चिमुकल्या मुलांबरोबर खेळताना, त्यांच्यासोबत हसताना आणि गप्पा मारताना दिसतात. इतक्यात अशोक सराफ यांची एन्ट्री होते आणि ते मुलांना थोडंसं ओरडताना दिसतात. पुढच्या क्षणी या दोघांची गोड जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळते. या सुंदर संवादातून त्यांच्या दोघांच्या केमिस्ट्रीची झलक पुन्हा एकदा दिसून येते. निवेदिता सराफ यांचा साधा आणि देखणा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
अशोक सराफ हे यापूर्वीपासूनच ‘अशोक मा.मा.’ या मालिकेतील मुख्य पात्र साकारत आहेत. त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता या मालिकेत निवेदिता सराफ यांच्या प्रवेशामुळे कथानकात एक वेगळा रंग भरला जाणार आहे.
या जोडीनं एकत्र स्क्रीन शेअर करणं म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी एक खास पर्वच ठरणार आहे. या मालिकेचा प्रसार दररोज रात्री ८:३० वाजता ‘कलर्स मराठी’वर होतो. पहिल्या प्रोमोनेच प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आलं असून, अनेक चाहते आता या सदाबहार जोडप्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
हे पण वाचा.. तेजश्री प्रधानचा नववधूप्रमाणे लूक सोशल मीडियावर व्हायरल; चाहत्यांनी केली कमेंट्सची बरसात
मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही जोडी नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. त्यांच्या अभिनयातली सहजता आणि नैसर्गिकता प्रेक्षकांना पुन्हा मोहात पाडणार हे निश्चित आहे.
हे पण वाचा.. तू ही रे माझा मितवा’ मालिकेचे ३०० भाग पूर्ण; सेटवर साजरा झाला आनंदोत्सव, अर्णव-ईश्वरी म्हणाले..







