ADVERTISEMENT

सचिन तेंडुलकरांचा मुलगा Arjun Tendulkar लवकरच विवाहबंधनात; साखरपुड्याची बातमी चर्चेत

क्रिकेटपटू Arjun Tendulkar ने उद्योगपती रवी घई यांच्या नात सानिया चंदोकसोबत साखरपुडा केला असून, हा खासगी समारंभ मुंबईत पार पडला.
Arjun Tendulkar

मुंबई – भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने नुकताच आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत, मुंबईतील प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यातील सानिया चंदोक (Saaniya Chandok)  हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. हा समारंभ अत्यंत खासगी पद्धतीने, निवडक नातेवाईक व जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला.

सानिया चंदोक या उद्योगपती रवी घई यांच्या नात आहेत. घई कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून फूड व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अग्रस्थानी आहे. ग्रॅव्हिस ग्रुपच्या अंतर्गत ‘द ब्रुकलिन क्रीमरी’, बास्किन रॉबिन्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय आइस्क्रीम ब्रँड्सचे संचालन यांच्याकडे आहे. याशिवाय, मुंबईतील प्रतिष्ठित इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्सदेखील या समूहाच्या मालकीचे आहेत. उद्योगक्षेत्रात त्यांची ओळख अब्जावधी रुपयांच्या साम्राज्यासाठी आहे.

Arjun Tendulkar सध्या २५ वर्षांचा असून, गोव्याच्या संघाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळतो. डावखुरा वेगवान गोलंदाज व अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघात असून, आगामी काळात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तो सातत्याने मेहनत घेत आहे. फर्स्ट क्लास, लिस्ट ए आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या साखरपुड्याची अधिकृत घोषणा तेंडुलकर किंवा घई कुटुंबाकडून करण्यात आलेली नसली, तरी सोशल मीडियावर या बातमीची जोरदार चर्चा रंगली आहे. Sachin Tendulkar यांचा मुलगा Arjun Tendulkar आता अब्जाधीश घराण्याचा जावई होणार असल्याने चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

हे पण वाचा.. Bigg Boss 19 मध्ये मराठी स्पर्धकांची एन्ट्री? अभिजीत सावंतच्या नावावर चर्चेचा केंद्रबिंदू

हे पण वाचा..Arjun Tendulkar आणि Saaniya Chandok यांच्या लग्नसोहळ्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली, तरी हा सोहळा क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील दोन मान्यवर कुटुंबांच्या नात्यांना एकत्र आणणारा ठरेल, यात शंका नाही.