ADVERTISEMENT

अपूर्वा नेमलेकरचा मालवणी अंदाज! भरलेलं पापलेट, कोळंबी फ्राय आणि आईसाठी खास सरप्राइज जेवण चर्चेत

apurva nemlekar malvani jevan video viral :
apurva nemlekar malvani jevan video viral

apurva nemlekar malvani jevan video viral : मालवणी किंवा कोकणी जेवणाचं नाव घेतलं तरी रसिकांच्या तोंडाला पाणी सुटतं. कोंबडी वडे, मच्छीचं सार, कोळंबी फ्राय असे नुसते पदार्थ नव्हे, तर त्या जेवणात एक संस्कृती, एक ओळख दडलेली असते. मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांचा कोकणाशी घट्ट नातं आहे. हेच नातं आणि त्यातली चव अभिनेत्री Apurva Nemlekar हिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओतून पुन्हा एकदा जिवंत केली आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ‘शेवंता’ म्हणून घराघरात पोहोचलेली अपूर्वा नेमळेकर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. कारण, तिने तिच्या घरी केलेल्या अस्सल मालवणी जेवणाचा एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अपूर्वा स्वतः स्वयंपाक करताना दिसते — मासे फ्राय करताना येणारा तो ‘किर्र-किर्र’ आवाज ऐकून तिच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद चाहत्यांना भावला आहे.

या खास बेतात भरलेलं पापलेट, कोळंबी फ्राय आणि कोळंबी भात असा अप्रतिम मेनू होता. “ही एकमेव किर्र-किर्र मी कायम ऐकू शकते,” असं म्हणत अपूर्वाने हा क्षण चाहत्यांशी शेअर केला. तिच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला — “तोंडाला पाणी सुटलं”, “भारी मासे दिसतायत”, “अपूर्वा मॅडम, एकदम झकास बनवलंय” अशा प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

एका चाहत्याने मजेशीर कमेंट केली – “आयुष्य सुंदर आहे फक्त असे मासे मिळायला हवेत.” यावर अपूर्वाने उत्तर देत सांगितलं की, “यासाठी शूटिंग लवकर संपवून थेट मालाड फिश मार्केट गाठलं. आईचा वाढदिवस होता म्हणून खास जेवण बनवलं. पण माहिमचं सिटीलाइट मार्केट मात्र मिस केलं — तिथले मासे म्हणजे अप्रतिम!”

या संवादातून तिचं घरगुती, भावनिक आणि माणुसकीचं रुप चाहत्यांच्या मनात अधिकच घर करतंय.
‘रात्रीस खेळ चाले’मधील तिची शेवंता ही भूमिका अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे. त्यानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी आणि सध्या ‘शुभविवाह’ मालिकेत ती प्रभावी भूमिका साकारत आहे.

हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली मधील तारा म्हणजेच भाग्यश्री दळवीचा डान्स व्हिडीओ चर्चेत, चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद

सध्याच्या या व्हिडीओमुळे Apurva Nemlekar पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मालवणी पाककलेचा तिच्या हातांनी तयार झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना कोकणच्या चवीची आणि अपूर्वाच्या साधेपणाची नवी ओळख मिळाली आहे.

हे पण वाचा.. Bigg Boss Marathi 6: घरात होणार ‘सुपर मॉडेल’ची ग्रँड एन्ट्री, कोण आहे ती?

apurva nemlekar malvani jevan video viral