apurva nemlekar beach proposal video after marriage : प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १४ फेब्रुवारीला मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Apurva Nemlekar हिने आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला. व्हॅलेंटाईन्स डेच्याच दिवशी तिने तनुज गोवळकरसोबत लग्नगाठ बांधली आणि सोशल मीडियावर विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. लग्नानंतर आता अपूर्वा आणि तनुज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, कारण तनुजने लग्नाआधीचा एक खास आणि भावूक क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
तनुज गोवळकरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ म्हणजे अपूर्वाला दिलेलं सरप्राइज प्रपोजल. काही महिन्यांपूर्वी दोघेही समुद्रकिनारी फिरायला गेले असताना हा क्षण घडला होता. व्हिडीओ शूट होत असतानाच अचानक तनुज समुद्रकिनाऱ्यावर गुडघ्यावर बसतो आणि अपूर्वासमोर लग्नाची मागणी घालतो. हा क्षण अपूर्वासाठी पूर्णपणे अनपेक्षित होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आश्चर्य स्पष्टपणे या व्हिडीओत दिसून येतो.
या प्रपोजलनंतर अपूर्वाने क्षणाचाही विलंब न करता आपला होकार दिला. त्यानंतर दोघांनीही हातातील अंगठ्या कॅमेऱ्यासमोर दाखवत आपल्या एंगेजमेंटची घोषणा केली. हा व्हिडीओ पाहताना चाहत्यांनाही हा क्षण अतिशय रोमँटिक आणि भावूक वाटत आहे.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तनुजने लिहिलेल्या शब्दांनी अनेकांची मनं जिंकली आहेत. “अन् तिने होकार दिला… आम्ही फक्त वीकेंडला फिरायला गेलो होतो, पण तो दिवस अचानक प्रपोजलमध्ये बदलला. हे प्रपोजल स्क्रिप्टेड वाटू शकतं, पण काही गोष्टी देवाने आधीच ठरवलेल्या असतात,” असं त्याने नमूद केलं आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी, म्हणजेच लग्नाच्या साधारण अडीच महिने आधी हा खास क्षण घडल्याचंही त्याने स्पष्ट केलं.
या व्हिडीओवर चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. अनेकांनी या जोडीला पुढील वाटचालीसाठी प्रेम आणि आनंदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अपूर्वासाठी हे दुसरं लग्न असलं तरी तिच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद स्पष्ट दिसतो.
हे पण वाचा.. १२ दिवस सुट्टी असूनही ‘ठरलं तर मग’मध्ये रोज दिसली जुई गडकरी; कारण सांगत म्हणाली – टीममुळे सगळं शक्य झालं
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर Apurva Nemlekar ने ‘रात्रीस खेळ चाले’, ‘आभास हा’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच ती ‘शुभविवाह’ मालिकेत झळकली होती. आता लग्नानंतर ती कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांसमोर येणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
हे पण वाचा.. ठरलं तर मग: साक्षीचा खूनाचा डाव फसला! अस्मितावर जीवघेणा हल्ला, सायलीच्या धाडसामुळे मोठं सत्य उघड होण्याच्या मार्गावर









