apurva gore navratri post : देशभरात शारदीय नवरात्र उत्सवाची रंगत सुरू आहे. देवीच्या नऊ रुपांची आराधना, दांडिया-गरबा, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून हा सण साजरा केला जातो. या उत्सवात स्त्रीशक्तीला विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक कलाकार सोशल मीडियावर स्त्रियांच्या योगदानाचा गौरव करणारे संदेश शेअर करतात. पण याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अपूर्वा गोरे हिनं केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
अपूर्वा गोरेनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीतून पुरुषांना उद्देशून लिहिलं – “Dear Men, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील स्त्रियांना आदर देऊ शकत नसाल, त्यांना भावनिक त्रास देत असाल, तर नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊ नका. आम्हाला खोटं नाट्य नकोय, तर खरी वागणूक हवी आहे.” तिचा हा थेट आणि स्पष्ट संदेश पाहून अनेकांनी टाळ्या वाजवल्या तर काहींनी चर्चाही रंगवल्या.
अपूर्वा गोरे ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. विविध फोटोज, व्हिडिओज आणि खास पोस्ट्सद्वारे ती चाहत्यांशी संवाद साधत असते. याआधीसुद्धा तिनं सामाजिक मुद्द्यांवर आपली मतं स्पष्टपणे व्यक्त केली आहेत. त्यामुळे तिची ही पोस्ट केवळ एक सोशल अपडेट न ठरता, महिलांच्या भावनांना वाचा फोडणारा संदेश ठरली आहे.
हे पण वाचा.. मनोजच्या आजाराने वाढवलं घरचं टेन्शन, ‘पिंगा ग पोरी पिंगा’ मालिकेत वल्लरीची खंबीर साथ!
टीव्हीवरही अपूर्वा गोरेनं प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिनं साकारलेली ‘ईशा’ ही भूमिका प्रेक्षकांची लाडकी ठरली. मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी आजही ईशा या पात्राला चाहत्यांच्या मनात खास स्थान आहे. त्यामुळेच अपूर्वाच्या प्रत्येक वक्तव्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो.
नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीच्या पूजनाचा उत्सव मानला जातो. मात्र अपूर्वा गोरे हिनं याच काळात समाजातील दुहेरी भूमिका दाखवणाऱ्यांना आरसा दाखवला आहे. तिचा संदेश साधा पण प्रभावी आहे – “सन्मान नसेल, तर शुभेच्छाही नकोत.”
हे पण वाचा.. मेघा धाडेने व्यक्त केलं प्राप्ती रेडकरबद्दलचं मत; म्हणाली, “हिरोईनच्या एक-दोन भूमिका म्हणजे करिअर संपलं नाही”
apurva gore navratri post








