ADVERTISEMENT

अपूर्वा नेमळेकर पुन्हा संसार थाटण्यास उत्सुक; म्हणाली, “योग्य जोडीदार मिळाल्यास दुसरी संधी घ्यायलाच आवडेल”

apoorva nemlekar dusrya lagnababat vaktavya : लोकप्रिय मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दुसऱ्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तिने स्पष्टपणे सांगितलं की, योग्य जोडीदार मिळाला तर ती आयुष्याला पुन्हा एक नवा अध्याय सुरू करण्यास तयार आहे.
apoorva nemlekar dusrya lagnababat vaktavya

apoorva nemlekar dusrya lagnababat vaktavya : मराठी मनोरंजनसृष्टीत अपूर्वा नेमळेकर हे नाव चाहत्यांसाठी नवीन नाही. तिच्या दमदार अभिनयाने आणि ठसठशीत व्यक्तिमत्त्वामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. ‘आभास हा’, ‘आराधना’, ‘प्रेमाची गोष्ट’ आणि विशेषत: ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील ‘शेवंता’ या भूमिकेमुळे अपूर्वा नेमळेकर घराघरात पोहोचली. मात्र, अभिनयाच्या यशस्वी प्रवासाबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्यही अनेकदा चर्चेत राहिलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अपूर्वाने स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रामाणिकपणे संवाद साधला. या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, ती लग्नासाठी दुसरी संधी घेण्यास तयार आहे का? या प्रश्नावर अभिनेत्रीने मन मोकळं केलं. ती म्हणाली, “मला वाटतं की जीवनात दुसरी संधी घेणं चुकीचं नाही. कोणाबरोबर आपण उरलेलं आयुष्य घालवणार आहोत हे तितकंच महत्त्वाचं आहे. जर योग्य जोडीदार मिळाला, जो प्रेम, मैत्री आणि परस्पर आदर या तिन्ही गोष्टी जपेल, तर मी नक्कीच दुसरी संधी घेईन.”

अपूर्वाने पुढे सांगितलं की, नातं फक्त औपचारिक राहायला नको, तर एकमेकांना पुढे नेणारं असावं. तिच्या मते, असा जोडीदार मिळावा ज्याच्यासोबत वेगळ्या कोणत्याही गोष्टींची गरज भासणार नाही आणि जीवन अधिक सुंदर वाटेल. “दोघंही त्या मार्गावर चालत असू जिथे तिसऱ्या व्यक्तीची गरजच नाही, तिथेच खरी आयुष्याची मजा आहे,” असं ती म्हणाली.

अपूर्वा नेमळेकरच्या वैयक्तिक जीवनाकडे पाहिलं तर, तिने २०१४ मध्ये रोहन देशपांडेसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, काही कारणांमुळे हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्या अनुभवांनंतर आता अभिनेत्रीने स्वतःला पुन्हा एकदा संसारासाठी तयार केलं आहे.

हे पण वाचा.. अर्जुन सायलीने रंगेहात पकडली प्रियाची चोरी, गाठोड्यामुळे उघड होणार सायलीचा भूतकाळ Tharala Tar Mag 30 September

मराठी मनोरंजन विश्वात करिअरच्या शिखरावर असताना वैयक्तिक आयुष्यातील अशा चढ-उतारांना सामोरं जाणं अपूर्वासाठी सोपं नव्हतं. पण आज ती पुन्हा आत्मविश्वासाने सांगते आहे की योग्य जोडीदार मिळाला तर ती संसाराचा नवा अध्याय सुरू करण्यास अजिबात मागेपुढे पाहणार नाही.

अपूर्वा नेमळेकरचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर तिचे चाहते नक्कीच आनंदी झाले आहेत. कारण पडद्यावर ती जशी धाडसी आणि ठाम दिसते, तशीच ती आयुष्यातील निर्णय घेण्यातही ठाम भूमिका बजावत आहे.

हे पण वाचा.. बिग बॉस 19 मधून आवेज दरबारची अचानक एक्झिट; कुटुंबानेच पैसे देऊन काढलं बाहेर? Awez Darbar Bigg Boss 19

apoorva nemlekar dusrya lagnababat vaktavya