ADVERTISEMENT

वचन दिले तू मला फेम अभिनेत्री अनुष्का सरकटेचा फिटनेस मंत्र: साधं जेवण, आवळा आणि मनापासून खाण्याचा सल्ला

anushka sarkate diet routine fitnes mantr : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या डाएट रुटीन, फिटनेस सवयी आणि ग्लोइंग त्वचेचं साधं रहस्य प्रेक्षकांसमोर उघड केलं आहे.
anushka sarkate diet routine fitnes mantr

anushka sarkate diet routine fitnes mantr : मराठी टेलिव्हिजनवर सध्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री Anushka Sarkate सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘वचन दिले तू मला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनयासोबतच तिचा फिटनेस आणि नैसर्गिक ग्लो कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी अनुष्का आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या खाण्याच्या सवयी आणि डाएटबाबत मोकळेपणाने संवाद साधला.

अनुष्का स्वतःला फुडी असल्याचं लपवत नाही. तिला विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात आणि जेवणातूनच आपल्याला ऊर्जा मिळते, असं ती ठामपणे सांगते. रोजच्या जेवणात काय असेल याची तिला नेहमीच उत्सुकता असते. विशेष म्हणजे, तिला भेंडी आणि मेथीपासून बनवलेले पदार्थ फार आवडतात. मेथीचा पराठा असो किंवा साधी भाजी, हे पदार्थ तिच्या डब्यात हमखास असतात.

मराठवाड्याची मुलगी असल्यामुळे ठेच्यावरील तिचं प्रेमही तितकंच खास आहे. सेटवर अनेकदा सहकलाकार तिच्याकडे ठेचा आहे का, असं विचारत असल्याचं ती हसत सांगते. सध्या डाएटमुळे ती पोळ्या टाळते आणि भाकरीला प्राधान्य देते. बाजरीची भाकरी आणि वांग्याची भाजी हा तिच्या आवडीचा खास मेनू असल्याचंही तिने नमूद केलं.

गोड पदार्थांची आवड असूनही अनुष्का त्यावर नियंत्रण ठेवते. थेट गोड खाण्याऐवजी ती फळं खाते. अननस किंवा हंगामी फळं तिच्या डाएटचा भाग आहेत. याशिवाय वळे लाडू हा पारंपरिक आणि पौष्टिक गोड पदार्थ ती संध्याकाळच्या वेळेला खाते. चारच्या सुमारास भूक लागली की हा पर्याय तिला योग्य वाटतो.

अनुष्काच्या दैनंदिन सवयींमध्ये आवळ्याला विशेष स्थान आहे. ती रोज कच्चा आवळा मीठ लावून खाते. जेवणानंतर बडीशेप खाण्याऐवजी अख्खा आवळा खाण्याची सवय तिने लावून घेतली आहे. केसांसाठी आणि पचनासाठी आवळा किती उपयुक्त आहे, याचा अनुभव तिने स्वतः घेतला आहे. पूर्वी ॲसिडिटीचा त्रास होत असे, मात्र आवळ्यामुळे तो पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याचं ती सांगते.

ग्लोइंग त्वचा आणि फिटनेसचा मंत्र विचारल्यावर अनुष्का फार साधं उत्तर देते. सकाळी कोमट पाणी, त्यात लिंबू, कधी आलं, तर कधी मेथी किंवा बडीशेप घालून पिण्याची सवय तिने लहानपणापासून लावून घेतली आहे. बदाम खाणं हाही तिच्या दिनक्रमाचा भाग आहे. कोणतंही कठोर डाएट न करता, आवडतं खाणं आणि प्रमाण पाळणं हाच तिचा खरा फिटनेस मंत्र आहे.

हे पण वाचा.. देवमाणूस मालिकेतील ‘लाली’ ठरली गेमचेंजर, भूमिकेबद्दल सोनम म्हसवेकर ने व्यक्त केल्या भावना म्हणाली

शेवटी ती एकच सल्ला देते—मनाला आवडणारं खा, पण मर्यादेत. आपल्या आवडीचे पदार्थ खाल्ल्यावर चेहऱ्यावर येणारं समाधान आणि तेज कुठल्याही डाएटपेक्षा जास्त प्रभावी असतं. त्यामुळे स्वतःवर अन्याय न करता, समतोल साधत जगण्याचा सल्ला Anushka Sarkate आपल्या चाहत्यांना देते.

हे पण वाचा.. कमळी मालिकेत मोठा कट उघडकीस येणार? कामिनीच्या कारस्थानामुळे नातेसंबंधांवर संकट

anushka sarkate diet routine fitnes mantr