anushka sarkate ayush sanjiv jabrat marathi cinema : मराठी टेलिव्हिजन विश्वातून अनेक कलाकार सध्या मोठ्या पडद्याकडे वाटचाल करताना दिसत आहेत. नुकतीच ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली होती आणि आता त्या पाठोपाठ स्टार प्रवाहच्या आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ‘वचन दिले तू मला’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अनुष्का सरकटे लवकरच मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
अनुष्का सरकटे सध्या स्टार प्रवाहवरील मालिकेमुळे चर्चेत आहे. तिच्या सहज अभिनयामुळे आणि पडद्यावरील व्यक्तिमत्त्वामुळे ती अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. याच दरम्यान तिने सोशल मीडियावर तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाची अधिकृत झलक शेअर केली आणि चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आयुष संजीव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे Anushka Sarkate Ayush Sanjiv ही जोडी याआधी ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेत एकत्र झळकली होती आणि त्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
आता हीच लोकप्रिय जोडी ‘जब्राट’ या संगीतमय आणि रोमँटिक मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र येत आहे. चित्रपटात आयुष संजीव ‘प्रिन्स’ तर अनुष्का सरकटे ‘निशा’ ही भूमिका साकारणार आहेत. कॉलेज जीवन, मैत्री, प्रेम, स्वप्नं आणि तरुणाईचा उत्साह या सगळ्यांचा सुरेख मिलाफ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘तू आणि मी’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.
‘जब्राट’ हा सिनेमा केवळ प्रेमकहाणीपुरता मर्यादित न राहता कॉलेज विश्वातील भावनिक नातेसंबंध, मैत्रीतील गोडवा आणि तरुणाईच्या स्वप्नांची गोष्ट मांडतो. या चित्रपटात आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे यांच्यासोबतच वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट, प्रगती कोळगे, संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव यांसारखे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
हे पण वाचा.. टीव्हीवरील साधी कमळी प्रत्यक्षात ग्लॅमरस! सुनिधी चौहानच्या कॉन्सर्टमधील विजया बाबरचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, Anushka Sarkate Ayush Sanjiv जोडीचा ‘जब्राट’ सिनेमा येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्याकडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या अनुष्काच्या या नव्या प्रवासाकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष लागलं असून, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे.
हे पण वाचा.. रितेश देशमुखची दमदार एन्ट्री! Bigg Boss Marathi 6 ची थीम जाहीर, शो कधी आणि कुठे पाहता येणार?







