ADVERTISEMENT

अभिनेत्री अनुष्का पिंपूटकर हिने सुरू केला स्वतःचा ज्वेलरी ब्रँड; बिझनेस लॉन्च करताच नवऱ्याची खास प्रतिक्रिया चर्चेत

anushka pimputkar jewellery brand launch : लोकप्रिय मराठी अभिनेत्री अनुष्का पिंपूटकर हिने अभिनयासोबत आता उद्योजकतेकडे पाऊल टाकत स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. तिच्या या नव्या प्रवासाला चाहत्यांसह पती मेघन जाधवनेही खास शुभेच्छा दिल्या आहेत.
anushka pimputkar jewellery brand launch

anushka pimputkar jewellery brand launch : मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता आता विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत. अभिनयासोबत व्यवसायातही यश मिळवण्याचा हा नवा ट्रेंड सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. या यादीत आता ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री Anushka Pimputkar हिचं नावही सामील झालं आहे. तिने नुकताच स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

‘रंग माझा वेगळा’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’सारख्या गाजलेल्या मालिकांमधून Anushka Pimputkar घराघरांत पोहोचली. सध्या ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत आरुषी ही भूमिका साकारताना दिसते आहे. तिच्या साध्या पण प्रभावी अभिनयामुळे तिने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. आता अभिनयाच्या जोडीला तिने स्वतःचा व्यवसाय सुरू करत एक नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

अनुष्काने तिच्या ज्वेलरी ब्रँडला ‘AdoreU by Anushka’ असं नाव दिलं आहे. या ब्रँडअंतर्गत स्टायलिश, ट्रेंडी आणि दैनंदिन वापरासाठी योग्य अशा ज्वेलरी डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महिलांना रोजच्या आयुष्यात सहज वापरता येईल, अशीच ही ज्वेलरी असल्याचं अनुष्काने सोशल मीडियावर सांगितलं. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून कौतुकाचा अक्षरशः पाऊस पडताना दिसला.

फक्त चाहतेच नाही, तर मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकारांनीही Anushka Pimputkar हिच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे तिचा पती आणि अभिनेता मेघन जाधव याने केलेली कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “AdoreU माय लव्ह” अशी प्रेमळ प्रतिक्रिया देत त्याने पत्नीला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या रोमँटिक बॉन्डची झलक चाहत्यांनाही भावली आहे.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर Anushka Pimputkar आणि मेघन जाधव यांनी १६ नोव्हेंबर २०२५ रोजी विवाहबंधनात अडकत नवा अध्याय सुरू केला. त्यांच्या लग्नसोहळ्याला मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या मेघन ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंत ही नकारात्मक भूमिका साकारत असून त्याचा अभिनय प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चेत आहे.

हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली फेम भाग्यश्री दळवी हिने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; सहकलाकार म्हणाले, “खूप अभिमान वाटतो

अभिनय, वैयक्तिक आयुष्य आणि आता व्यवसाय अशा तिन्ही पातळ्यांवर Anushka Pimputkar यशस्वी वाटचाल करत असल्याचं चित्र दिसत आहे. तिचा हा नवा ज्वेलरी ब्रँड प्रेक्षकांच्या कितपत पसंतीस उतरतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे पण वाचा.. अनंत जोग यांच्या डोळ्यांत पाहिलं आणि घाबरले– अभिज्ञा भावे काय म्हणाली?

anushka pimputkar jewellery brand launch