anuj thakare navi gadi lakshmi nivas : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कौटुंबिक मालिका ‘लक्ष्मी निवास’ गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलं असून, हरीश ही भूमिका साकारणारा अभिनेता Anuj Thakare विशेषतः तरुण प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. आता मालिकेबाहेरही Anuj Thakare चर्चेत आला असून, त्याने नुकतीच एक आलिशान नवी गाडी खरेदी केली आहे.
Anuj Thakare ने ही आनंदाची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली. या व्हिडीओमध्ये तो आपल्या पत्नीसोबत नव्या गाडीची विधीपूर्वक पूजा करताना दिसतो. गाडी खरेदीचा हा क्षण केवळ वैयक्तिक आनंदाचा नसून, त्याच्या संघर्ष आणि मेहनतीचा प्रवास दाखवणारा असल्याचं त्याच्या पोस्टमधून स्पष्ट होतं. “स्वप्न पाहिलं होतं आणि आज ते स्वतःच्या कष्टातून पूर्ण झालं,” अशा भावनिक शब्दांत Anuj Thakare ने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अनुजची पत्नी अश्विनी गोरले हीदेखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. सध्या ती ‘झी मराठी’वरील ‘तारिणी’ मालिकेत काव्या ही भूमिका साकारत आहे. त्यामुळे ही कलावंत जोडगोळी चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. नव्या गाडीच्या पूजेचा व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांनी तसेच मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी अनुजचं मनापासून कौतुक केलं आहे. विकास पाटील, अक्षया देवधर, दिव्या पुगावकर, अक्षय केळकर यांसारख्या कलाकारांनी कमेंट्स करत Anuj Thakare ला शुभेच्छा दिल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये आणखी एक खास क्षण पाहायला मिळतो. गाडी खरेदीच्या आनंदात अनुज आणि अश्विनी यांनी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील लक्ष्मीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्याशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. मालिकेत आई-मुलाचं नातं साकारणारे हे दोघे खऱ्या आयुष्यातही तेवढ्याच जिव्हाळ्याचं नातं जपत असल्याचं या प्रसंगातून दिसून आलं.
हे पण वाचा.. Tharala Tar Mag : साक्षी जिवंत असल्याचं सायलीला कळलं, ब्रेकफास्ट डेटवरच मोठा धक्का
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या कथानकातही मोठे ट्विस्ट येणार असून जानू (जान्हवी) लवकरच सर्वांसमोर येणार असल्याचं संकेत मिळत आहेत. यामुळे पुढे जयंतचं काय होणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. मालिकेतील यश आणि वैयक्तिक आयुष्यातील आनंद यामुळे Anuj Thakare सध्या खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ अनुभवत आहे.
हे पण वाचा.. सायंकाळी ७ नंतर काहीही खाऊ नका! अभिनेत्री माधवी निमकरची फिटनेस टिप्स







