Ankita Walawalkar comedy video bigg boss 19 : ‘बिग बॉस १९’ सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचे लक्ष घरातील नाट्यमय घडामोडींवर आहे. प्रत्येक आठवड्यात नवी ट्विस्ट आणि टर्न्समुळे हा शो गाजत आहे. अशातच आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात लक्ष वेधून घेणारी अंकिता वालावलकर चर्चेत आली आहे. कारण तिने सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ शेअर करत स्वतःच “बिग बॉस १९” मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचं संकेत दिले.
अंकिताच्या या व्हिडीओत ती म्हणताना दिसते, “नमस्कार मंडळी, हिंदी बिग बॉसच्या घरात माझी वाइल्ड कार्ड एन्ट्री होतेय आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे. मराठी बिग बॉसच्या घरात मला तुम्ही खूप प्रेम दिलंत. तेच प्रेम या प्रवासातही मला मिळावं अशी आशा आहे.” चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
मात्र या व्हिडीओत शेवटी मोठा ट्विस्ट आहे. अंकिता बोलत असतानाच तिचा नवरा कुणाल आणि बहीण तिला उठवतात. म्हणजेच हा संपूर्ण प्रसंग अंकिताने पाहिलेलं स्वप्न असल्याचं समोर आलं. तरीदेखील या व्हिडीओमुळे चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.
हे पण वाचा.. पत्रिका न जुळल्याने संपलं नातं अभिनेत्री अमृता देशमुखचं ब्रेकअप बद्दल स्पष्ट वक्तव्य
अंकिताने व्हिडीओसोबत “आता गेम बदलणार कारण वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार…” अशी मजेदार कॅप्शन दिली होती. परिणामी हा अंकिता वालावलकर कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. धनंजय पोवार यांनी “मित्रा, आज खूप आनंद झाला, जोरात मारलंस ना!” अशी कमेंट केली. तर अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा घोसाळकरने “अरे यार, मी खूप उत्सुक होते” असं लिहिलं. अभिनेत्री प्रतीक्षा मुनगेकरनेही “काय गं?” अशी प्रतिक्रिया दिली.
या मजेदार व्हिडीओनंतर आता खरोखरच अंकिता हिंदी बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार का, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. चाहत्यांचा मात्र ठाम विश्वास आहे की अंकिता जर खरंच शोमध्ये आली तर घरातील समीकरणं नक्कीच बदलतील.
हे पण वाचा.. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे पुन्हा एकत्र? सोशल मीडियावर चर्चांना उधाण नवीन प्रोजेक्ट मध्ये सोबत दिसणार का?









