ADVERTISEMENT

स्टार प्रवाहवर ‘आनंदी’ची एंट्री; प्राइम स्लॉटसह दमदार स्टारकास्ट, कोणत्या मालिकेवर होणार परिणाम?

anandi serial star pravah new serial time date : स्टार प्रवाहवर लवकरच ‘आनंदी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी यांची जोडी, तसेच रोहित परशुरामची मुख्य भूमिका यामुळे या मालिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे.
anandi serial star pravah new serial time date

anandi serial star pravah new serial time date : मराठी मालिकांच्या दुनियेत लवकरच आणखी एक नवी कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘Anandi’ ही नवी मालिका सुरू होणार असून या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अलीकडेच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला असून त्यामधून ‘Anandi’ची कथा आणि कलाकारांची झलक पाहायला मिळाली आहे.

या मालिकेतून जाई खांडेकर ही नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. पहिल्या प्रोमोमध्ये तिच्यासोबत आलापिनी निसळ आणि पयोष्णी ठाकूर यांचीदेखील झलक पाहायला मिळाली होती. मात्र या मालिकेत आणखी कोणते कलाकार दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. आता नव्या प्रोमोमुळे ‘Anandi’ची दमदार स्टारकास्टही प्रेक्षकांसमोर आली आहे.

‘Anandi’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि अभिनेता समीर धर्माधिकारी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अनुभवी कलाकारांचा सहभाग असल्यामुळे मालिकेच्या कथेला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मालिकेची कथा एका कुटुंबाभोवती फिरणारी भावनिक गोष्ट सांगते. आत्माराम जाधव उर्फ आबा हे आपल्या तीन नातींसोबत इचलकरंजी येथे राहतात. त्यांच्या मुलगी आणि जावयाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर या तिन्ही नातींची जबाबदारी आबांवर येते. या मोठ्या धक्क्यानंतरही त्यांनी स्वतःला सावरत नातींच्या भविष्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतलेला असतो.

आबा युगंधरच्या मिलमध्ये काम करत असतात आणि आपल्या नातींना शिक्षण देऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, हेच त्यांचे स्वप्न असते. त्याचवेळी ‘Anandi’ ही नात दृष्टीहीन असली तरी तिचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र खूप सकारात्मक असतो. तिच्या आयुष्यातील संघर्ष आणि तिच्या कुटुंबाचा प्रवास या मालिकेतून दाखवला जाणार आहे.

कथेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे युगंधर निंबाळकर या पात्राचा प्रवेश. काही कारणांमुळे तो आनंदीशी लग्न करण्यास तयार होतो. मात्र दोघांच्या वयातील मोठा फरक आणि परिस्थिती पाहता हे लग्न खरोखर होईल का, हा प्रश्न मालिकेत पुढे उलगडणार आहे.

हे पण वाचा .. बिग बॉस मराठी 6 च्या घरातून रुचिता जामदारची एक्झिट प्रेक्षकांमध्ये नाराजी

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता रोहित परशुराम या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत या नव्या प्रोजेक्टची माहिती दिली होती. मात्र नव्या प्रोमोमध्ये त्याची झलक अद्याप दाखवण्यात आलेली नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे ‘Anandi’ला स्टार प्रवाहने थेट प्राइम स्लॉट दिला आहे. ही मालिका ३० मार्चपासून दररोज रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे सध्या आठ वाजता दाखवली जाणारी ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका आता साडेसात वाजता दाखवली जाणार आहे.

तसेच शिवानी बावकरची ‘साधी माणसं’ ही मालिका लवकरच बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत वाहिनीकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. वेळ बदलली जाईल की मालिका ऑफ एअर होईल, याबाबत पुढील काही दिवसांत स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा.. गिरीजा प्रभूचा शाही पारंपरिक लूक व्हायरल; ‘तू चांदवा’ गाण्यानंतर अभिनेत्रीची जोरदार चर्चा

anandi serial star pravah new serial time date

दरम्यान, भावनिक कथा, दमदार कलाकार आणि प्राइम स्लॉट यामुळे ‘Anandi’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरेल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.