Amruta Khanvilkar at Lalbaugcha Raja मुंबईतील लालबागचा राजा म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि भक्तांच्या नवसाला उतरवणारा गणपती. दरवर्षी लाखो भाविकांसोबतच अनेक नामवंत सेलिब्रिटीसुद्धा राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. यंदाही गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच अनेक कलाकारांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. त्यात मराठमोळी आणि लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिचाही समावेश आहे. परंपरेप्रमाणे तिने राजाच्या चरणी एक खास दान अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.
हा क्षण तिच्यासाठी आणि चाहत्यांसाठी विशेष ठरला. अमृताने पारंपरिक लूकसह साडी नेसून लालबागच्या राजाच्या दरबारात प्रवेश केला. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड भावला. दर्शन घेतल्यानंतर अमृताने बाप्पाच्या चरणी चांदीच्या दुर्वा अर्पण केल्या. भक्तिभावाने केलेल्या या अर्पणामुळे तिच्या या भाविक रुपाचं कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर अमृताचा लालबागच्या राजाच्या दर्शनाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हजारो चाहत्यांनी तो पाहिला असून अनेकांनी कमेंट्समधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी “तुझा हा भाविक लूक मनाला भावला” असं लिहित तिच्या भक्तीला दाद दिली.
हे पण वाचा.. चहावर फिदा प्राजक्ता माळी; म्हणाली- “चहा असेल तर मसाला चहा पाहिजे, नाहीतर नाही!”
अमृता खानविलकर ही केवळ मराठी सिनेसृष्टीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री आहे. ‘चंद्रमुखी’ या सिनेमामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मराठी चित्रपटांसोबतच तिने अनेक हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. तिची मोठी चाहतावर्गीय फौज सोशल मीडियावर कायम तिच्या अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत असते.
गणेशोत्सव हा सण केवळ उत्सव नसून तो भक्ती आणि संस्कृतीचं एकत्र दर्शन घडवणारा पर्व मानला जातो. आणि अमृता खानविलकर लालबागचा राजाच्या चरणी या क्षणामुळे चाहत्यांनी पुन्हा एकदा पाहिलं की, ग्लॅमरसोबतच अमृताच्या आयुष्यात श्रद्धा आणि परंपरेलाही तितकंच महत्त्व आहे.
हे पण वाचा.. ‘आई कुठे काय करते’ फेम Ashvini Mahangade स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत झळकणार









