amruta deshmukh past relationship breakup : मराठी मनोरंजनसृष्टीत लोकप्रिय असलेली अमृता देशमुख (Amruta Deshmukh) ही नेहमीच तिच्या कामामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या भूतकाळातील नातेसंबंधाबद्दल उघडपणे बोलत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
अमृताने सांगितलं की, तिचं एक प्रेमसंबंधातलं नातं केवळ कुंडली जुळली नाही म्हणून तुटलं. ती म्हणाली, “मी एका रिलेशनशिपमध्ये होते. दोन-अडीच वर्षं आम्ही एकत्र होतो, एकमेकांच्या सवयी, गुण-दोष ओळखले होते. पण अखेर सगळं संपलं आणि त्याचं कारण फक्त पत्रिका न जुळणं होतं. खरं सांगायचं तर हे मला खूपच अनपेक्षित वाटलं.”
या अनुभवाबद्दल बोलताना अमृताने प्रश्न उपस्थित केला की, “जेव्हा दोन माणसं एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांबरोबर राहायचं ठरवतात, तेव्हा ग्रह-ताऱ्यांनी खरंच ठरवायचं का की ते एकत्र राहतील की नाही?”
तिने पुढे सांगितलं की, तिच्या आयुष्यातला हा प्रसंग ‘बिग बॉस’मध्ये जाण्यापूर्वी काही वर्षं आधी घडला. वयाच्या २२-२३ व्या वर्षी तिचं पहिलं गंभीर नातं होतं. “मी त्याला माझा पती परमेश्वर मानलं होतं, पण तसं घडलं नाही. मागे वळून पाहिलं तर जाणवतं की जे झालं ते कदाचित चांगल्यासाठीच झालं.”
अभिनेत्रीने हेही सांगितलं की, त्या काळात तिच्या आई-वडिलांनी तिला धीर दिला आणि म्हणाले की, “आता तू यातून बाहेर पडली आहेस, तर आपण तुझं नाव मॅट्रिमोनियल साइटवर टाकूया का?” या टप्प्यावर अमृतानेही सकारात्मक दृष्टीकोन ठेवला.
हे पण वाचा.. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे पुन्हा एकत्र? सोशल मीडियावर चर्चांना उधाण नवीन प्रोजेक्ट मध्ये सोबत दिसणार का?
नंतर तिला अभिनेता प्रसाद जवादे भेटला आणि त्यांच्या नात्यात प्रेम फुललं. प्रसादसोबतचं नातं ठरवताना मात्र अमृताने स्पष्टपणे कुंडलीकडे दुर्लक्ष केलं. “आमचं प्रेम खरं आहे हे आम्हाला ठाऊक होतं. म्हणून पत्रिका पाहायचीच नाही, असा निर्णय घेतला. कारण आयुष्यभर सोबत राहायचं ठरवलं की, चढ-उतार आलंच, मग ग्रह-ताऱ्यांची गरज कशाला?” असं ती म्हणाली.
आज अमृता देशमुख तिच्या कामासोबतच खासगी आयुष्यातही समाधानी आहे. भूतकाळातील अनुभवांबद्दल ती बोलली असली, तरी चाहत्यांना तिच्या धाडसी स्वभावाचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा अभिमान वाटतो.
हे पण वाचा.. अभिनेत्री रसिका वखारकर चा साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्याचं नाव आलं समोर









