amol naik daughter naming ceremony akshaya name : काही मालिका अशा असतात की त्या संपल्यानंतरही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. त्यातील पात्रं, संवाद आणि नाती वर्षानुवर्षं लक्षात राहतात. ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका त्यापैकीच एक. राणादा आणि अंजलीची जोडी जितकी लोकप्रिय ठरली, तितकाच त्यांच्या सोबत झळकलेला बरकतही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे Amol Naik.
अलीकडेच Amol Naik यांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवली. ४ डिसेंबर रोजी त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदवार्ता चाहत्यांपर्यंत पोहोचवली होती. आता त्यांच्या लेकीचा नामकरण सोहळा उत्साहात पार पडला असून, त्याचे खास क्षण त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये Amol Naik ‘धुरंधर’ चित्रपटातील गाण्यावर ठेका धरताना दिसतात. या आनंदी वातावरणात त्यांनी आपल्या मुलीचं नाव जाहीर केलं. त्यांच्या लेकीचं नाव ‘अक्षया’ असं ठेवण्यात आलं आहे. नाव जाहीर करतानाच त्यांनी तिला हातात घेतलेला भावूक क्षणही चाहत्यांना पाहायला मिळाला.
पोस्टसोबत त्यांनी लिहिलेल्या शब्दांनी अनेकांच्या मनाला स्पर्श केला. “श्री स्वामी समर्थ. आमच्या छोट्या राजकुमारीचं बारसं आहे. ‘अक्षया’ हे नाव जसं अखंड आणि अर्थपूर्ण आहे, तसंच आमचं तिच्यावरचं प्रेमही अनंत आहे,” असे त्यांनी नमूद केले. पुढे त्यांनी लेकीच्या आगमनानंतर घरात आनंद, हास्य आणि आशीर्वाद कसे भरून राहिले आहेत, याचीही मनोगत व्यक्त केली. तिचं नाव हे फक्त ओळख नसून त्यांच्या आयुष्याचं सुंदर स्वप्न असल्याचंही त्यांनी भावनिक शब्दांत सांगितलं.
या सोहळ्याला मराठी मनोरंजनविश्वातील काही जवळचे मित्रही उपस्थित होते. हार्दिक जोशी, सिद्धार्थ जाधव आणि स्वाती लिमये यांनी या खास क्षणी हजेरी लावत अभिनेत्याच्या आनंदात सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीचे फोटो Amol Naik यांनी शेअर करत सर्वांचे आभार मानले.
हे पण वाचा.. मला तुझ्याबरोबर राहायचं नाही!”तारिणी मालिकेत तारिणी-केदारचं जोरदार भांडण, लग्नाच्या ट्विस्टने वाढली उत्सुकता
सोशल मीडियावर या पोस्टला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी अभिनेत्याला आणि त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’मधून लोकप्रियता मिळवलेल्या Amol Naik यांचा हा नवा जीवनप्रवास चाहत्यांसाठीही तितकाच खास ठरत आहे.
हे पण वाचा.. गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून तणाव आणि चिंता…”प्रियदर्शन जाधव ची भावनिक पोस्ट चर्चेत









