ADVERTISEMENT

कन्यारत्नाचा जन्म! ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अमोल नाईक झाला बाबा लेकीचं नावही जाहीर करत म्हणाला..

amol naik baby girl arrival marathi news : ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अमोल नाईक आज बाबा झाला आहे. दत्तजयंतीच्या दिवशी घरी चिमुकलीचं आगमन होताच अभिनेत्याने लेकीचं नावही जाहीर करत आनंद व्यक्त केला.
amol naik baby girl arrival marathi news

amol naik baby girl arrival marathi news : मराठी मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे Amol Naik. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणादाच्या जिवलग मित्राची भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या प्रमुख भूमिकांसह या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला घराघरांत लोकप्रियता मिळाली. त्यातच बरकतची भूमिका साकारणारा Amol Naik हा विशेष आवडता कलाकार ठरला. आता हा मालिकेतला मित्र-बरकत प्रत्यक्ष आयुष्यात एका नव्या भूमिकेत दाखल झाला आहे – तो म्हणजे ‘वडील’ म्हणून.

४ डिसेंबरच्या दत्तजयंतीसारख्या शुभदिनी Amol Naik यांच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला. ही आनंदवार्ता त्यांनी थेट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली. “मुलगी झाली हो” या छोट्याशा पण भावूक कॅप्शनसह अमोलने लेकीच्या आगमनाची घोषणा केली आणि काही मिनिटांतच पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

अमोलने लिहिलं, “श्री स्वामी समर्थ… तुम्हा सर्वांना सांगताना मला खूप आनंद होतोय की आमच्या घरी राजकुमारी आली आहे. वेलकम बेबी गर्ल.” त्यासोबतच त्यांनी “लव्ह श्रीशा नाईक” असेही नमूद केले. त्यामुळे त्यांच्या लेकीचं नाव ‘श्रीशा’ असल्याचं स्पष्ट झालं. चाहत्यांनी, मित्रपरिवाराने आणि सहकलाकारांनी अमोल व त्यांच्या पत्नीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Amol Naik याच्या अभिनय कारकिर्दीचा विचार केला तर छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’मधील त्याचा साधा, निरागस आणि मैत्रीणीत निष्ठा राखणारा बरकत प्रेक्षकांना आजही आठवतो. मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेत त्याची भूमिका विशेष गाजली. अलीकडेच तो कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेतही झळकला होता.

हे पण वाचा.. मराठी माणूस मराठी कलाकाराला…स्वप्नील जोशीच्या रहस्यमय पोस्टने वाढवली उत्सुकता; अभिनेता नेमकं काय जाहीर करणार?

वैयक्तिक आयुष्यातील या नव्या प्रवासामुळे Amol Naik सध्या आनंदात आहे. लेकीच्या आगमनाने त्याच्या घरात साजरा झालेला आनंद सोशल मीडियावरूनही स्पष्ट दिसत आहे. चाहत्यांसाठी, सहकलाकारांसाठी आणि अमोलसाठीही हा क्षण खास आहे. आता तो ‘अभिनेता’ सोबतच ‘बाबा’ ही ओळख अभिमानाने सांभाळणार आहे.

हे पण वाचा.. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी पोहोचली प्राजक्ता गायकवाड फटाके, रांगोळी आणि ओवाळणीने कुटुंबीयांनी केले स्वागत

amol naik baby girl arrival marathi news