ADVERTISEMENT

‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम शिवानी नाईक आणि अभिनेता अमित रेखी यांच्या साखरपुड्याने चाहत्यांमध्ये आनंदाची लाट!

amit rekhi shivani naik engagement photos : लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी नाईक आणि अभिनेता अमित रेखी यांनी थाटामाटात साखरपुडा केला आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अप्पी आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’चा नायक अमित यांच्या या नव्या सुरुवातीसाठी मराठी कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
amit rekhi shivani naik engagement photos

amit rekhi shivani naik engagement photos : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका अप्पी आमची कलेक्टर मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी नाईक आता तिच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. छोट्या पडद्यावर “अप्पी” म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या शिवानीने नुकताच मराठी अभिनेता अमित रेखी सोबत साखरपुडा केला आहे. या दोघांचा साखरपुडा पारंपरिक आणि थाटामाटात पार पडला असून, त्यांचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत.

या सोहळ्याला दोघांनी पारंपरिक पोशाखात हजेरी लावली होती. शिवानीने आकर्षक लाल रंगाची साडी नेसली होती, तर अमित रेखीने ऑफ-व्हाइट रंगाचा सदरा परिधान करून लुक पूर्ण केला होता. या दोघांचा साधेपणातला देखणा अंदाज चाहत्यांच्या मनात घर करून गेला आहे.

‘Amit Rekhi-Shivani Naik’ यांचा हा साखरपुडा पार पडल्यापासून मराठी मनोरंजन क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत अप्पीची भूमिका साकारून शिवानी नाईकने लोकप्रियतेचा शिखर गाठला होता. तिच्या अभिनयाची प्रेक्षकांनी दखल घेतली आणि ती मराठी प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक बनली.

तर, तिचा होणारा पती अमित रेखी देखील छोट्या पडद्यावरील ओळखलेला चेहरा आहे. त्याने भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. त्यानंतर आई आणि बाबा रिटायर होत आहेत या स्टार प्रवाहवरील मालिकेत मकरंदची भूमिका साकारत त्याने वेगळा ठसा उमटवला. सध्या तो पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत आहे आणि त्याच्या अभिनयाचीही जोरदार चर्चा आहे.

शिवानी आणि अमित यांच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोघांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी “मेड फॉर इच अदर” अशी कमेंट्स देत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

हे पण वाचा.. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर कोसळला दुःखाचा डोंगर; अपघातात वडिलांचं निधन Prarthana Behere Father Death

आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे – Amit Rekhi-Shivani Naik यांचा विवाह सोहळा नेमका केव्हा पार पडणार? याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चाहत्यांमध्ये याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मराठी कलाविश्वातील ही नवी जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असून, प्रेक्षक मात्र त्यांच्या या नव्या जीवनप्रवासाला मनापासून शुभेच्छा देत आहेत.

हे पण वाचा.. “भाई… तू नड!” प्रणीत मोरेच्या पाठीशी उभा धनंजय पोवार; म्हणाला, “मराठी इंडस्ट्रीनं दाखवावी एकजूट”

amit rekhi shivani naik engagement photos