ADVERTISEMENT

अभिनेता अमित रेखी ची नवी सुरुवात बहिणीसोबत सुरू केला व्यवसाय, साखरपुड्यानंतर मोठी घोषणा

amit rekhi new business : अप्पी आमची कलेक्टर फेम अभिनेत्रीशी साखरपुडा केल्यानंतर अभिनेता अमित रेखीने बहिणीसोबत मिळून ‘राही by शिवस्मित’ हा साड्यांचा नवा ब्रँड सुरू केला असून, या नवीन प्रवासासाठी चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
amit rekhi new business

amit rekhi new business : मराठी टीव्ही क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता Amit Rekhi सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील दोन महत्त्वाच्या टप्प्यांमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी अप्पी आमची कलेक्टर मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री शिवानी नाईकसोबत साखरपुडा केल्यानंतर Amit Rekhi आता आणखी एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. त्यांनी बहिण स्मितल नाईकसोबत मिळून एक खास व्यवसायाची घोषणा केली असून, ही बातमी त्यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Amit Rekhi ने जाहीर केलेल्या पोस्टनुसार, त्यांचा नवीन व्यवसाय साड्यांच्या ब्रँडशी संबंधित आहे. या ब्रँडचं नाव ‘राही by शिवस्मित’ असून, पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणारा हा उपक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं. “परंपरा ते ट्रेंड… आम्ही सादर करतोय ‘राही’ by शिवस्मित,” अशा कॅप्शनसह अमितने आपल्या नवीन प्रवासाची घोषणा केली. त्याने आपल्या बहिणीसोबत मिळून हा उपक्रम सुरू केल्याचा आनंदही व्यक्त केला आणि चाहत्यांकडून प्रेम व आशीर्वाद मागितले.

साडी व्यवसायात उतरलेल्या Amit Rekhi च्या या पोस्टला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी कमेंट करून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला असून, नव्या क्षेत्रातही ते यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

अमितच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी मराठी मालिकांमधून आपली दमदार ओळख निर्माण केली आहे. भाग्य दिले तू मला, आई आणि बाबा रिटायर होत आहेत, पिंगा गं पोरी पिंगा या मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांची स्क्रीनवरील नैसर्गिकता आणि साधेपणा प्रेक्षकांना विशेष भावतो.

अमितने ऑक्टोबर महिन्यात अभिनेत्री शिवानी नाईकसोबत साखरपुडा केला होता. दोघांची जुळलेली जोडी चाहत्यांना विशेष पसंत असून, आता त्यांच्या लग्नाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्याचदरम्यान Amit Rekhi चा हा नवीन व्यवसाय त्यांच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

हे पण वाचा.. तू कुठे आहेस मीरा? – तुला जपणार आहे मालिकेतून मुख्य अभिनेत्रीची एक्झिट? नव्या प्रोमोमुळे वाढल्या चर्चा

अभिनयासोबत उद्योजकतेतही पाऊल टाकून Amit Rekhi ने आपली कार्यशैली अधिक विस्तारली आहे. त्यांच्या या बदलत्या प्रवासाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम यशस्वी ठरण्याची दाट शक्यता आहे.

हे पण वाचा.. भावना परत आणू शकेल का सिद्धूला? ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा नवा प्रोमो पहा..

amit rekhi new business