ADVERTISEMENT

‘ठरलं तर मग’ फेम Amit Bhanushali अभिनयासोबत कॉर्पोरेट विश्वातही यशस्वी, एकाच वेळी दोन क्षेत्रांमध्ये करत आहे काम!

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेतील अर्जुन सुभेदार म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली केवळ अभिनयच नव्हे, तर कॉर्पोरेट क्षेत्रातही सक्रिय आहे. अॅड, जिंगल्स आणि व्हिडीओ एडिटिंगपासून ते अ‍ॅनिमेशनपर्यंत अनेक भूमिका तो सक्षमपणे निभावत आहे.
Amit Bhanushali

स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन सुभेदार म्हणजेच अभिनेता Amit Bhanushali केवळ अभिनयच नव्हे, तर कॉर्पोरेट क्षेत्रातही सक्रिय आहे. अॅड, जिंगल्स आणि व्हिडीओ एडिटिंगपासून ते अ‍ॅनिमेशनपर्यंत अनेक भूमिका तो सक्षमपणे निभावत आहे.

‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशाली अभिनयासोबत कॉर्पोरेट विश्वातही यशस्वी, एकाच वेळी दोन क्षेत्रांमध्ये करत आहे काम!

स्टार प्रवाहवरील गाजलेली मालिका ‘ठरलं तर मग’ अनेक मराठी घरांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील अर्जुन सुभेदार हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं असून, हे पात्र साकारणारा अभिनेता Amit Bhanushali याचा अभिनय देखील तितकाच सरस आहे. मात्र अमित केवळ अभिनयापुरताच मर्यादित न राहता, कॉर्पोरेट क्षेत्रातही आपल्या कारकिर्दीचा ठसा उमठवत आहे, ही बाब फारच प्रेरणादायी आहे.

एका मुलाखतीमध्ये अमित भानुशालीने खुलासा केला की, अभिनयाशिवाय तो अॅड फिल्म्स, जिंगल्स, व्हिडीओ एडिटिंग आणि अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रातदेखील सक्रिय आहे. “दिवसाचे २४ तास कमी पडतात,” असं म्हणत त्याने आपल्या व्यस्त दिनचर्येचा उल्लेख केला. तो पुढे म्हणतो, “मी दररोज फक्त चार ते पाच तास झोपतो. सकाळी वर्कआउट केल्यानंतर शूटिंगसाठी जातो, आणि जिथे वेळ मिळतो, तिथे मी कॉर्पोरेट काम करत राहतो.”

Amit Bhanushali याने सांगितले की त्याच्याकडे स्वतःचा सेटअप आहे आणि लॅपटॉप नेहमी त्याच्या सोबत असतो. शूटिंगदरम्यान जर सीनमध्ये उपस्थिती आवश्यक नसेल, तर त्या वेळेत तो अॅड फिल्म्स किंवा अ‍ॅनिमेशन एडिटिंगचं काम पार पाडतो. “कधी टेक्स्ट अ‍ॅनिमेशन, कधी रेडी अ‍ॅनिमेशन… सर्व प्रकारचं काम मी करतो,” असेही त्याने स्पष्ट केले.

त्याचे हे बहुपर्यायी कौशल्य केवळ त्याच्या कारकीर्दीसाठीच नव्हे, तर नवोदित कलाकारांसाठीही एक प्रेरणास्त्रोत आहे. मर्यादित वेळ आणि झोपेमध्येही अमित आपले सर्व कामे प्रभावीपणे पूर्ण करतो, यावरून त्याच्या मेहनतीची आणि तळमळीची झलक दिसून येते.

या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो अभिनयाला कधीच दुय्यम मानत नाही. उलट, दोन्ही क्षेत्रांमध्ये तो आपले स्थान प्रभावीपणे टिकवून ठेवतो. अभिनयासोबतच इतर कौशल्यांची जोपासना करत तो आजच्या डिजिटल युगात एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून उभा राहत आहे.

हे पण वाचा..ग्रुपिझममुळे कलाकारांना संधी मिळत नाही, हे दुर्दैव आहे” – Bhargavi Chirmuley यांची खंत