akshaya naik navratri bold photoshoot : मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री akshaya naik पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेहमीच आपल्या वेगळ्या प्रयोगांसाठी ओळखली जाणारी अक्षयाने यंदा नवरात्रीनिमित्त एक खास फोटोशूट केलं असून, त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
या फोटोशूटमध्ये akshaya naik निळ्या रंगाच्या साडीत पाहायला मिळते. तिचा लूक जितका मोहक आहे तितकाच त्यामागचा संदेशही महत्त्वाचा आहे. अक्षयाने या शूटच्या माध्यमातून रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ या चित्रपटातील यमुना या दमदार भूमिकेला आदरांजली वाहिली आहे.
अक्षयाने आपल्या कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं आहे की यमुनेचा प्रवास हा केवळ कलेसाठी दिलेल्या पोझपुरता मर्यादित नव्हता, तर तो तिच्या शरीरावर, तिच्या निवडींवर आणि स्वतःच्या सन्मानावर पुन्हा हक्क सांगण्याचा एक धाडसी निर्णय होता. “धैर्य कधीही गोंगाट करत नाही, ते शांत आणि लवचिक असतं. म्हणूनच अनेकदा त्याबद्दल गैरसमज होतात,” असं म्हणत तिनं स्त्रीशक्तीची जाणीव या फोटोशूटद्वारे व्यक्त केली.
याआधीही akshaya naik ने अनेक वेगवेगळ्या स्त्रीप्रधान भूमिकांवर आधारित फोटोशूट केले आहेत. ‘क्वीन’मधील कंगना रणौत आणि ‘कहानी’मधील विद्या बालन यांच्या पात्रांना तिनं आपल्या अनोख्या पद्धतीनं साकारलं होतं. तिच्या या प्रयोगशीलतेला चाहत्यांकडून नेहमीच दाद मिळाली आहे.
हे पण वाचा.. लग्न, करिअर आणि अध्यात्म… शिवानी सोनार ने शेअर केला तिच्या जीवनातील खास बदलांचा अनुभव
सध्या अक्षयाच्या नव्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. तिच्या बोल्ड आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाजाचं कौतुक होत आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिलं की अक्षया फक्त अभिनयातच नव्हे तर आपल्या विचारांतून आणि सादरीकरणातूनही प्रेक्षकांना नेहमी काहीतरी नवीन देत असते.
अक्षयाच्या या खास फोटोशूटमुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे की ती फक्त एक अभिनेत्री नसून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी एक प्रयोगशील कलाकार आहे.
हे पण वाचा.. शशांक केतकर ४० व्या वर्षात: “कितीही वय वाढलं तरी मी माझ्या कुटुंबासाठी खंबीरपणे उभा राहणार”









