akshay waghmare second time father yogita pregnant news : अभिनेता अक्षय वाघमारे (akshay waghmare) पुन्हा एकदा आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण अनुभवणार आहे. डॅडी अरुण गवळींची लेक आणि त्याची पत्नी योगिता गवळी सध्या दुसऱ्यांदा गरोदर आहे. या आनंदाची बातमी स्वतः अक्षयने आपल्या सोशल मीडियावरून चाहत्यांबरोबर शेअर केली असून त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अक्षयने इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे ज्यात योगिता आपल्या बेबी बंपसह पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. फोटोसाठी अक्षयने ऑफ व्हाईट रंगाचा कुर्ता आणि मरून रंगाचं जॅकेट परिधान केलं असून योगिता सुद्धा ऑफ व्हाईट साडी आणि मरून शैला या लूकमध्ये खुलून दिसतेय. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि एकमेकांप्रतीचं प्रेम चाहत्यांच्या नजरेतून सुटलेलं नाही.
या पोस्टसाठी अक्षयने “सीझन २” असं कॅप्शन दिलं आहे, ज्यावरूनच चाहत्यांनी त्याचा आनंद ओळखला. योगिताच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कार्यक्रम होस्ट करणाऱ्याने इन्स्टाग्रामवर अक्षयला टॅग करून तो व्हिडीओ शेअर केला असून त्यात दाम्पत्याची ग्रँड एंट्री, घरातील नातलग आणि मित्रमैत्रिणींचा नृत्याचा जल्लोष, तसेच त्यांच्या खास फोटोशूटचे काही सुंदर क्षण पाहायला मिळतात.
या खास क्षणी मनोरंजनविश्वातूनही शुभेच्छांचा ओघ सुरू झाला आहे. अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी अक्षयच्या पोस्टवर ‘अभिनंदन’ अशी कमेंट करत त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनीही “लव यू फॅमिली”, “कॉन्ग्रॅट्स दादा”, “वेटिंग फॉर लिटिल प्रिन्स ऑर प्रिन्सेस” अशा कमेंट्स करून आपुलकी व्यक्त केली आहे.
अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी २०१९ साली लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याला पहिल्याच वर्षी एका मुलीचा आशीर्वाद लाभला. आता सहा वर्षांनंतर दोघे दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
३७ वर्षीय अक्षय वाघमारे ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘ती फुलराणी’, ‘खुर्ची’, ‘दोस्तीगिरी’, ‘बेधडक’ आणि ‘बस स्टॉप’ यांसारख्या मराठी चित्रपट व मालिकांमधील अभिनयासाठी ओळखला जातो. तो ‘बिग बॉस मराठी ३’ या रिअॅलिटी शोमध्येही झळकला होता.
हे पण वाचा.. रेश्मा शिंदेचा साऊथ इंडियन नवरा पवन तिला या खास नावानं मारतो हाक! अभिनेत्रीचा गूगल सर्चबाबत खुलासा
सध्या त्याचा हा कौटुंबिक आनंद पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. लवकरच अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या घरी नव्या सदस्याचं आगमन होणार असून सर्वत्र त्यांच्या कुटुंबाला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हे पण वाचा.. ठाकरे बंधूंची एकत्र उपस्थिती; सुबोध भावेच्या ५० व्या वाढदिवसाचा जल्लोष अंधेरीत!







