ADVERTISEMENT

साधी माणसं फेम अभिनेता आकाश नलावडे लग्नानंतर दोन वर्षांनी होणार बाबा वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली खास बातमी

लोकप्रिय मराठी अभिनेता Akash Nalawade याने आपल्या वाढदिवशी चाहत्यांसोबत एक खास गुडन्यूज शेअर केली आहे. ‘साधी माणसं’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा हा अभिनेता लवकरच बाबा होणार असून पत्नी रुचिकासोबतची त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
akash nalawade‌ baba honar vadhdivshi‌ gud news

akash nalawade‌ baba honar vadhdivshi‌ gud news :  मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे सध्या आनंदाच्या क्षणांचा अनुभव घेत आहे. आपल्या वाढदिवशी त्याने आयुष्यातील एक अतिशय महत्वाची बातमी चाहत्यांसमोर आणली. आकाश लवकरच बाबा होणार असून त्याने आणि पत्नी रुचिका धुरी यांनी ही आनंदवार्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

८ सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने आकाशने चाहत्यांना मिळालेलं हे सरप्राईज खूपच भावुक करणारं ठरलं. त्याची पत्नी रुचिकाने सोशल मीडियावर प्रेग्नन्सी टेस्ट किटचा फोटो शेअर करत, “आमच्या घरी लवकरच बाळाचं आगमन होणार आहे. आम्ही प्रेग्नंट आहोत… देवा तुझे आभार!” असं कॅप्शन दिलं. या पोस्टनंतर आकाश-रुचिका दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

रुचिकाने यासोबतच “Baby Arriving”, “घरचा नवीन सदस्य” असे हॅशटॅग्स दिले. या पोस्टला कलाकार मित्रांसह चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे. अभिनेत्री साक्षी गांधी, अभिनेते दिगंबर नाईक यांच्यासह अनेकांनी आकाश व रुचिकाला शुभेच्छा दिल्या.

आकाश नलावडे च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, २०२२ मध्ये त्याचा आणि रुचिकाचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर १८ मार्च २०२३ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ त्या काळात सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

हे पण वाचा.. साखरपुड्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला सोशल मीडियावर शेअर केले खास क्षण

कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, आकाशने ‘स्टार प्रवाह’वरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत पश्या ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यानंतर तो सध्या प्रसारित होणाऱ्या ‘साधी माणसं’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री शिवानी बावकरही महत्वाची भूमिका साकारत आहे. ही मालिका दररोज सायंकाळी ६:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

आता वाढदिवशीच दिलेल्या या गोड सरप्राईजमुळे आकाश नलावडे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चाहत्यांनीही त्याला आणि रुचिकाला भावी पालकत्वाच्या या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

हे पण वाचा.. घरच्यांचा विरोध असेल तर लग्नच नाही; प्रिया बापट उमेश कामत यांची प्रेमकहाणी Priya Bapat Umesh Kamat marriage

akash nalawade‌ baba honar vadhdivshi‌ gud news