ADVERTISEMENT

“माझ्या अपघाताची बातमी पसरली…”, अभिनेता ajinkya deo यांचं स्पष्टिकरण;  व्हिडिओने चाहत्यांना दिलासा!

ajinkya deo car accident rumour clarification : काही दिवसांपासून अभिनेता अजिंक्य देव यांच्या अपघाताची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत होती. मात्र अखेर स्वतः अजिंक्य देव यांनीच पुढे येऊन सत्य स्पष्ट केलं आहे. त्यांच्या एका व्हिडिओमुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ajinkya deo car accident rumour clarification

ajinkya deo car accident rumour clarification  :मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि देखणे अभिनेते अजिंक्य देव गेल्या काही दिवसांपासून एका अफवेमुळे चर्चेत आले होते. सोशल मीडियावर त्यांच्या अपघाताची बातमी वेगाने पसरू लागली होती. चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र अखेर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत अजिंक्य देव यांनी स्वतःच पुढे येऊन सत्य स्पष्ट केलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिलासा दिला.

अजिंक्य देव म्हणाले, “नमस्कार मी अजिंक्य देव. काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या अपघाताची बातमी पसरवली जात आहे. पण मी ठणठणीत बरा आहे. ही सर्व माहिती चुकीची आहे. माझ्या गाडीचा कोणताही अपघात झालेला नाही. कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि काळजी मला सतत जाणवते, त्याबद्दल मनापासून आभारी आहे.”

त्यांच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा दिलासा पसरला आहे. अनेकांनी त्यांच्या व्हिडिओवर कमेंट करत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केलं. काही चाहत्यांनी त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, यासाठी शुभेच्छाही दिल्या. अजिंक्य देव यांनी चाहत्यांचे आभार मानत सांगितलं की, “लोक अशा बातम्या का पसरवतात माहित नाही, कदाचित प्रसिद्धी हवी असेल. पण तुमचं प्रेम माझ्यासोबत आहे हे पाहून मन आनंदाने भरून आलं.”

दरम्यान, अजिंक्य देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकार आहेत. ते ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे धाकटे चिरंजीव असून त्यांनी अनेक मराठी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ‘सर्जा’, ‘कशासाठी प्रेमासाठी’, ‘माहेरची साडी’ यांसारख्या चित्रपटांमुळे ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. अलीकडेच ते मराठी सिनेमात पुन्हा सक्रीय झाले असून, त्यांनी काम केलेला ‘घरत गणपती’ हा सिनेमा प्रेक्षकांना विशेष भावला होता.

याशिवाय लवकरच ते रामायण या बहुचर्चित चित्रपटात रणबीर कपूर सोबत झळकणार आहेत. या चित्रपटामुळे ते हिंदी प्रेक्षकांनाही पुन्हा भेटणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

अपघाताची बातमी पसरल्यानंतर अनेकांनी त्यांना फोन करून चौकशी केली होती. मात्र त्यांनी स्पष्टिकरण दिल्यानंतर आता ही अफवा पूर्णपणे खोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेनंतर चाहत्यांनीही अफवा न पसरवण्याचं आवाहन सोशल मीडियावर केलं आहे.

हे पण वाचा.. टेलिव्हिजनमध्ये नखरे चालत नाहीत, काम करावंच लागतं – Smriti Irani स्पष्ट वक्तव्य

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य देव यांनी चाहत्यांना शुभेच्छा देत सांगितलं की, “असं प्रेम करत राहा, आशीर्वाद देत राहा.” त्यांच्या या शब्दांमुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुललं आहे. अफवा काहीही असो, खरा अजिंक्य देव मात्र ठणठणीत आणि आनंदी आहे.

हे पण वाचा.. “प्रिय अधि…” aishwarya narkar यांनी पती अविनाश नारकरांसाठी लिहिलं भावनिक पत्र

ajinkya deo car accident rumour clarification