aishwarya narkar suruchi adarkar set incident : मराठी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री Aishwarya Narkar आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि आपुलकीसाठी ओळखल्या जातात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्री सुरुची अडारकर आणि तितीक्षा तावडे यांनी सेटवरील एक मजेदार प्रसंग सांगत ऐश्वर्या नारकर यांचं खरं रूप उलगडलं आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेदरम्यान या तिघी अभिनेत्रींची मैत्री जुळली. तितीक्षा तावडे मालिकेची मुख्य नायिका, तर ऐश्वर्या नारकर यांनी खलनायिकेची भूमिका साकारली होती. सुरुची अडारकरने देखील या मालिकेत महत्त्वाची भूमिका निभावली होती. कामाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या तिघींमध्ये आजही घट्ट स्नेह टिकून आहे.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत या तिघींनी सेटवरील आठवणींना उजाळा दिला. तितीक्षा म्हणाली, “ऐश्वर्या ताईंच्या आयुष्यात एक गोष्ट खूप आवडते – त्यांचं सातत्य. मग ते व्यायाम असो की काम, त्या नेहमी नियमित राहतात.” यावर ऐश्वर्या नारकर हसत म्हणाल्या, “मी थोडी फटकळ आहे. मला जे वाटतं ते मी थेट बोलते.”
त्यावर सुरुची अडारकर म्हणाली, “ताई गोड बोलून दाखवण्यापेक्षा खरं सांगतात, त्यामुळे त्यांना समजून घेणं सोपं जातं.” मात्र तितीक्षा आणि सुरुची दोघींनी एक मजेदार किस्साही शेअर केला. पहिल्याच दिवशी सेटवर सुरुची सीन संपवून ऐश्वर्या यांच्या रूममध्ये आली, तेव्हा Aishwarya Narkar म्हणाल्या, “तुझं इथे काय काम आहे? आमची रूम लहान आहे, तू जा.”
तितीक्षा सांगते, “मी लगेच म्हणाले, अगं ताई, ती नवीन आहे, तिला माहिती नाही.” पण दुसऱ्या दिवशीही ऐश्वर्या नारकर यांनी तोच संवाद पुन्हा म्हटला. अखेर सुरुची म्हणाली, “आता मी इथेच बसणार आहे, तुला काय हवं ते कर.”
यानंतर या दोघींमध्ये मजेशीर नातं तयार झालं. सुरुची पुढे सांगते, “जेव्हा ताई सेटवर नसायच्या, तेव्हा मी त्यांना फोन करून म्हणायचे – पाहा, मी तुमच्या जागेवर बसले आहे.” यावर तितीक्षा हसत म्हणाली, “ताई जर असं बोलतात म्हणजे तुम्ही त्यांच्या हक्काची व्यक्ती आहात. कारण त्या ज्यांच्याशी जवळीक असते, त्यांच्याशीच अशा सहजपणे बोलतात.”
हे पण वाचा.. निलेश साबळे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘वहिनीसाहेब सुपरस्टार’ या नव्या शोमधून करणार धमाल!
या सर्व किस्स्यांमधून स्पष्ट होतं की, Aishwarya Narkar फटकळ असल्या तरी मनाने अतिशय प्रामाणिक आणि जिव्हाळ्याच्या आहेत. त्यांच्या स्वभावातील मोकळेपणा आणि पारदर्शकता यामुळेच आजही त्या इंडस्ट्रीत सर्वांच्या आवडत्या ठरल्या आहेत.
हे पण वाचा.. “‘तुला जपणार आहे’ फेम तनिष्का विशे: बॅकग्राउंड डान्सरपासून अभिनेत्रीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!”









