मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री Aishwarya Narkar यांनी आपल्या दमदार अभिनयासोबतच फिटनेसच्या बाबतीतही नेहमीच एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. वयाच्या पन्नाशीत प्रवेश करूनही त्यांचा आत्मविश्वास आणि सौंदर्य तरुणींनाही लाजवेल असाच आहे. नुकतंच त्यांनी केलंले एक मॉडर्न फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे, पण याच फोटोंवर काही नेटकऱ्यांनी केलेल्या टीका मात्र सोशल मीडियावर वादाचा विषय ठरल्या आहेत.
या फोटोशूटमध्ये ऐश्वर्या यांनी प्लाझो पँट आणि बॅक ओपन हॉल्टर नेक क्रॉप टॉप असा स्टायलिश वेस्टर्न लूक सादर केला आहे. त्यांच्या या लूकमध्ये आत्मविश्वास, फिटनेस आणि अदा स्पष्टपणे दिसून येते. मात्र, या लूकवर काहींनी टीका करत “ताई आपली संस्कृती विसरू नका”, “हे शोभत नाही” अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.
हे पण वाचा.. Jui Gadkari चा खुलासा: ‘ठरलं तर मग’ मालिका ना संपणार, ना लीप घेणार!
पण, यावेळी या टीकाकारांना प्रत्युत्तर देण्यासाठी अभिनेत्रीचे खास चाहते सरसावले आणि त्यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं. एका चाहत्याने लिहिलं, “तुमचे विचार छोटे आहेत, त्यांचे कपडे नाहीत.” तर दुसऱ्याने स्पष्ट केलं, “हिंदी अभिनेत्रींचा बोलबाला असतो, मग मराठी अभिनेत्रींना काय अधिकार नाही का आपला लूक एक्सप्लोर करायला?”
या वादात आणखी एक प्रतिक्रिया विशेष लक्ष वेधून घेत होती – “निगेटिव्ह बोलणारे स्वतः काय करत असतील, याचा विचार करा. फिटनेस आणि आत्मविश्वास जपणं ही प्रत्येकाची मर्जी असते. ते त्यांच्या मेहनतीचं फळ आहे.” कमेंट सेक्शनमध्ये अशा अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या जिथे Aishwarya Narkar यांच्या चाहत्यांनी त्यांचं समर्थन करत ट्रोलर्सला सुनावलं.
ऐश्वर्या नारकर ह्या केवळ टीव्ही मालिकांमध्येच नव्हे, तर रंगभूमी आणि सिनेमांमध्येही आपली छाप सोडणाऱ्या अभिनेत्रींमधील एक महत्त्वाचं नाव आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेनंतर त्या पुन्हा कोणत्या भूमिकेत दिसणार, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
या वादातून एक गोष्ट मात्र ठामपणे अधोरेखित होते – स्त्रियांनी आपली ओळख, आत्मविश्वास आणि शैली व्यक्त करणं ही निव्वळ एक वैयक्तिक बाब आहे, आणि त्यात समाजाने हस्तक्षेप करू नये. Aishwarya Narkar सारख्या अभिनेत्री केवळ अभिनयानेच नव्हे, तर त्यांच्या विचारांनी आणि आत्मभानानेही एक आदर्श निर्माण करत आहेत.
फिटनेस, आत्मविश्वास आणि स्वतःच्या शैलीशी निष्ठावान राहणं ही काळाची गरज आहे. आणि त्याच दिशेने Aishwarya Narkar आपला मार्ग बनवत आहेत. ट्रोलिंग करणाऱ्यांपेक्षा प्रेरणा देणाऱ्या अशा अभिनेत्रींचं कौतुक होणं हेच समाजासाठी सकारात्मक संकेत ठरावा.
हे पण वाचा.. Bigg Boss 19 चा पहिला प्रोमो प्रदर्शित; सत्तेचा खेळ सुरू होतोय! यंदा सलमानच्या ‘राजकीय’ जाळ्यात अडकणार घरातले खेळाडू?









