aishwarya avinash narakar sundari dance video viral : मराठी मनोरंजनविश्वातील आदर्श जोडपं म्हणून ओळखले जाणारे ऐश्वर्या आणि अविनाश नारकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संजू राठोडचं नव्याने प्रदर्शित झालेलं ‘सुंदरी’ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत असताना नारकर दाम्पत्याने या गाण्यावर खास व्हिडिओ शेअर केला. पारंपरिक वेशभूषेत त्यांनी केलेला जबरदस्त डान्स काही तासांतच व्हायरल ठरला आहे.
अविनाश आणि ऐश्वर्या नारकर हे दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स बनवून ते नेहमी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. अलीकडेच ऐश्वर्या नारकर यांनी इंस्टाग्रामवर पाच लाख फॉलोअर्स पूर्ण केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी खास ‘सुंदरी’ गाण्यावर डान्स करत व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये दोघांची केमिस्ट्री आणि एनर्जी पाहून नेटकरी अक्षरशः फिदा झाले आहेत.
चाहत्यांनी या डान्सवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “कसली सुंदर जोडी”, “दोघंही मेड फॉर इच अदर”, “लय भारी डान्स”, “कसले गोड दिसताय” अशा प्रतिक्रिया सतत व्हिडिओवर येत आहेत. काहींनी तर नारकर दाम्पत्याची एनर्जी पाहून “अविनाश भाऊ ऐकत नाहीत… तरीही डान्स अप्रतिम झाला” अशा मजेशीर कमेंट्सही केल्या.
हे पण वाचा.. “निर्मिती सावंतांच्या ‘दहशती’मुळे मी लेखनाला सुरुवात केली” – समीर चौघुले यांनी सांगितला किस्सा
संजू राठोडचं ‘सुंदरी’ गाणं सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या गाण्याचे गायक, गीतकार आणि संगीतकार स्वतः संजू असून, संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. ‘शेकी’ नंतर हे गाणं चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अविनाश नारकर सध्या ‘तारिणी’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. दुसरीकडे ऐश्वर्या नारकर लवकरच ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकातून रंगभूमीवर परत येणार असून, या नाटकात अविनाश नारकरही झळकणार आहेत. त्यामुळे रंगमंचावरही ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही जोडी प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे.
हे पण वाचा.. लग्नावरील सामाजिक दबावामुळे स्वानंदी भावूक; “वीण दोघातली ही तुटेना”च्या प्रोमोवर प्रेक्षकांची दाद









