ADVERTISEMENT

अभिनेता प्रसाद जवादे यांना मातृशोक; अमृता देशमुखची भावनिक पोस्ट व्हायरल

Actor Prasad Jawade mother passes away Amruta Deshmukh emotional post : अभिनेता प्रसाद जवादे यांची आई प्रज्ञा जवादे यांचं निधन झालं असून या दुःखद घटनेनंतर पत्नी अमृता देशमुखने सासूबाईंसाठी लिहिलेली हृदयस्पर्शी पोस्ट सध्या चर्चेत आहे.
Actor Prasad Jawade mother passes away Amruta Deshmukh emotional post

Actor Prasad Jawade mother passes away Amruta Deshmukh emotional post : मराठी मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता प्रसाद जवादे यांना आईच्या निधनाचा मोठा धक्का बसला आहे. प्रसाद यांच्या आई प्रज्ञा जवादे यांचं रविवारी, २८ डिसेंबर रोजी निधन झालं. त्या ६५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. उपचार सुरू असतानाही अखेर ही लढाई त्यांना जिंकता आली नाही. आईच्या जाण्याने प्रसाद जवादे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रसाद आणि त्यांच्या आईचं नातं अतिशय जिव्हाळ्याचं होतं. सोशल मीडियावर प्रसाद अनेकदा आईसोबतचे क्षण शेअर करताना दिसायचे. त्यांच्या पोस्टमधून आईबद्दलचं प्रेम आणि आदर स्पष्टपणे जाणवत असे. आईच्या निधनानंतर कुटुंबावर शोककळा पसरली असून, चाहत्यांकडूनही प्रसादला धीर देणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत.

या दुःखाच्या काळात प्रसादची पत्नी आणि अभिनेत्री Amruta Deshmukh हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अमृताने सासूबाईंसोबतचे काही खास फोटो शेअर करत आपल्या भावना शब्दांत मांडल्या. तिच्या पोस्टमध्ये सासूबाईंसोबतचं नातं केवळ सुनेचं नव्हतं, तर आई-मुलीचं असल्याचं ती सांगते. पहिल्याच दिवसापासून त्यांनी तिला मुलीसारखं प्रेम दिलं, असं अमृताने आपल्या शब्दांतून व्यक्त केलं आहे.

Amruta Deshmukhने सासूबाईंच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या मराठी भाषेवरील प्रेमाबद्दल आणि कवितांबद्दलच्या ओढीबद्दलही लिहिलं आहे. दीर्घ संवाद, साध्या पण अर्थपूर्ण भावना आणि नात्यातील आपुलकी यामुळे हे नातं अधिक घट्ट झालं होतं, असं ती सांगते. सासूबाईंचे डोळे आणि त्याच भावना प्रसादच्या डोळ्यांत दिसतात, असा भावनिक उल्लेखही तिने पोस्टमध्ये केला आहे.

याशिवाय, अमृताने प्रसाद आणि सासऱ्यांवर अभिमान व्यक्त करत, या कठीण प्रवासात त्यांनी प्रज्ञा जवादे यांना दिलेल्या साथीसाठी कृतज्ञताही व्यक्त केली आहे. याआधी अमृताने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे सासूबाईंच्या निधनाची माहिती चाहत्यांना दिली होती.

हे पण वाचा.. पारू मालिका फेम अभिनेता प्रसाद जवादेवर दुःखाचा डोंगर; आई प्रज्ञा जवादेंचे निधन

प्रज्ञा जवादे यांच्या निधनाने जवादे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहते प्रसाद जवादे आणि Amruta Deshmukh यांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळावी, अशा भावना व्यक्त करत आहेत.

हे पण वाचा.. मराठीवर येतोय नव्या कथांचा धमाका! ‘सनई चौघडे’ आणि ‘दीप ज्योती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Actor Prasad Jawade mother passes away Amruta Deshmukh emotional post