बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘abir gulaal’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे रसिकांची उत्सुकता, तर दुसरीकडे राजकीय व सामाजिक वाद उफाळून आले आहेत.
Table of Contents
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा वादाचा विषय ठरलेला आहे — पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा आगामी हिंदी चित्रपट ‘abir gulaal’, ज्यात वाणी कपूर व सोनी राजदाने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत, त्याच्या प्रदर्शनावरून चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या कथानकाच्या रोमँटिक रंगरंगोटीसोबतच ‘abir gulaal’ ला भेटणाऱ्या चाहत्यांच्या अपेक्षा आणि विरोधाबद्दल जोरदार वाद निर्माण झाला आहे.
Dia Mirza चा पाठिंबा, पण चुकीच्या वेळी?
ज्येष्ठ अभिनेत्री दीया मिर्झाने नुकत्याच News18 Showsha सोबतच्या दिलेल्या एका मुलाखतीत फवाद खानच्या पुनरागमनाचे समर्थन आणि अभिनयाचे कौतुक करत कला आणि राजकारण वेगळे मानण्याचे आव्हान केलं तिने नमूद केले की, कला ही द्वेष, राजकारण आणि सीमा ओलांडून शांतता व सलोखा निर्माण करण्याचे साधन असते. तिने याही पुढे जाऊन भारतीय आणि पाकिस्तानी कलाकारांमध्ये भविष्यात अधिक सहकार्य व्हावे, अशी आशाही व्यक्त केली.
मात्र विशेष म्हणजे, दीया मिर्झाची ही मुलाखत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यापूर्वीचे होते, ज्यामध्ये 26 निरपराधांचा बळी गेला. त्यामुळे तिच्या विधानांची वेळ आणि त्याचा संदर्भ यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
हे पण वाचा..Pahalgam terror attack नंतर ‘Abir Gulaal’ चित्रपटावर बहिष्काराची मागणी, फिल्म फेडरेशनने दिला विरोधाचा इशारा
Ridhi Dogra ची संतप्त प्रतिक्रिया
‘‘abir gulaal’ चित्रपटातील अभिनेत्री ऋिद्धी डोग्राने मात्र पहलगाम हल्ल्यानंतर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने लिहिले की, “दहशतवाद एका विशिष्ट दिशेकडूनच सातत्याने येतो आहे. तो केवळ माणुसकीच नव्हे तर विश्वासही उद्ध्वस्त करतो आहे.”
तिने मुस्लिम समुदायातील चांगल्या व्यक्तींना पुढे येऊन दहशतवादाचा निषेध करण्याचे आवाहन केले. तिच्या मते, अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असताना मौन राखणाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, कारण “पुनःपुन्हा त्या एकाच जागेवरून आपत्ती येते आहे.”

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचा कठोर निर्णय
पहलगाम हल्ल्यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने पुन्हा एकदा 2019 मध्ये लागू केलेल्या निर्देशाचे पुनरुच्चारण केले. त्यात भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील कोणताही निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, गायक अथवा तंत्रज्ञ जर पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करताना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. याशिवाय, ‘abir gulaal’ या चित्रपटाचे भारतात प्रदर्शन होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
FWICE ही संस्था सुमारे पाच लाख सदस्य असलेली असून, ती 32 संघटनांची प्रतिनिधी आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचा बॉलिवूडवर मोठा परिणाम होऊ शकतो.
abir gulaal Fawad Khan ची भावनिक प्रतिक्रिया
या वादाच्या पार्श्वभूमीवर फवाद खानने देखील सोशल मीडियावर पहलगाम हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त करत एक छोटा संदेश दिला. “पहलगाममधील अमानुष हल्ल्याची बातमी ऐकून फार दु:ख झाले. या भयंकर घटनेतील पीडित कुटुंबांसाठी मी प्रार्थना करतो,” असे त्याने लिहिले.
त्याच्या या निवेदनावर मात्र भारतात अनेकांकडून शंका उपस्थित केली जात आहे, की ही प्रतिक्रिया केवळ abir gulaal चित्रपटाच्या विरोधातील वातावरण निवळवण्यासाठी दिली आहे का?
राजकीय पक्षांचा विरोध
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर कडाडून आक्षेप घेतला आहे. पक्षाचे नेते अमेय खोपकर यांनी स्पष्टपणे सांगितले, “पाकिस्तानी कलाकार असलेल्या कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही. ज्या कोणीतरी चित्रपट प्रदर्शित करायची हिंमत असेल, त्यांनी ती करून दाखवावी.”
भूतकाळातील घटनांची पुनरावृत्ती
फवाद खान याआधी ‘खूबसूरत’ (2014), ‘कपूर अँड सन्स’ (2016) आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ (2016) सारख्या चित्रपटांतून लोकप्रिय झाला होता. मात्र 2016 मधील उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर अनौपचारिक बंदी लादली गेली. करण जोहर, शाहरुख खान यांच्या चित्रपटांनीही त्यावेळी वाद ओढवून घेतला होता.
या सर्व घटनांमुळे पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागाविषयी भारतीय जनमानसात नेहमीच शंका व विरोध कायम राहिला आहे.
भारत सरकारचे कठोर निर्णय
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. इंद्रा जलसंधी स्थगित करण्यात आली असून, अटारी इंटीग्रेटेड चेक पोस्ट बंद करण्यात आले आहे. तसेच SAARC व्हिसा सवलती खाली येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या भारतभेटींनाही बंदी घालण्यात आली आहे.
या सर्व घटकांनी ‘abir gulaal’ च्या आगामी प्रदर्शनासंबंधी अनिश्चिततेची छाया पसरवली असून, बॉलिवूडमध्ये ‘कलाकारांच्या सीमारेषा’ हा वाद पुन्हा एकदा केंद्रस्थानी उभा राहिला आहे.