ADVERTISEMENT

स्टार प्रवाहचा लाडका नायक मोठ्या पडद्यावर; हास्यजत्रेतील लोकप्रिय अभिनेत्रीही सोबत!

abhijit amkar Priyadarshini Indalkar marathi film : स्टार प्रवाहवरील तू ही रे माझा मितवा फेम अभिजित आमकर आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून ‘लग्नाचा शॉट’ या आगामी सिनेमात त्याच्यासोबत हास्यजत्रेतील प्रियदर्शिनी इंदलकर दिसणार आहे.
abhijit amkar Priyadarshini Indalkar marathi film

abhijit amkar Priyadarshini Indalkar marathi film : नवीन वर्षाच्या सुरुवातीला मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नव्या कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यातच आता एका वेगळ्या विषयामुळे चर्चेत आलेला चित्रपट म्हणजे ‘लग्नाचा शॉट’. नुकतंच या चित्रपटाचं अधिकृत पोस्टर समोर आलं असून त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टरमधूनच चित्रपटातील मुख्य कलाकारांचा उलगडा झाला असून स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेतील नायक Abhijit Amkar आता थेट मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Tu Hi Re Majha Mitwa’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला Abhijit Amkar पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत सिनेमात दिसणार आहे. त्याच्यासोबत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर ही नायिकेच्या भूमिकेत आहे. पोस्टरमध्ये ही जोडी पारंपरिक लग्नाच्या पोशाखात दिसत असून दोघांच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव पाहूनच कथेत काहीतरी वेगळं घडणार असल्याची कल्पना येते.

या पोस्टरमध्ये रेल्वे, बस, वळणावळणाचे रस्ते आणि राशीचक्र अशा अनेक प्रतीकात्मक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यावर ‘लग्नाआधीही, लग्नानंतरही’ असा मजकूर झळकतो, जो कथेत वेळ, नशीब आणि निर्णय यांचा मोठा खेळ असणार असल्याचं सूचित करतो. लग्नासारख्या महत्त्वाच्या प्रसंगात घडणारा गोंधळ, त्यातून निर्माण होणाऱ्या गंमती आणि अनपेक्षित वळणांची झलक या पोस्टरमधून मिळते.

या चित्रपटाबाबत दिग्दर्शक अक्षय गोरे यांनी सांगितलं की, ‘लग्नाचा शॉट’ ही कथा कोणताही उपदेश न करता केवळ मनोरंजनावर भर देणारी आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहू शकेल, हलकंफुलकं आणि स्वच्छ मनोरंजन देणारा सिनेमा बनवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रेक्षकांना हसवणं आणि त्यांना रोजच्या तणावातून थोडा विरंगुळा देणं, हाच या चित्रपटाचा मुख्य हेतू आहे.

हे पण वाचा.. शुभमंगल सावधान! जय दुधाणे अडकला लग्नबंधनात; हर्षला पाटीलसोबत सुरू केला आयुष्याचा नवा प्रवास

या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केलं असून संगीताची जबाबदारी प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली आहे. अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ६ फेब्रुवारी रोजी ‘लग्नाचा शॉट’ प्रदर्शित होणार असून Abhijit Amkar चाहत्यांसाठी हा सिनेमा नक्कीच खास ठरणार आहे.

हे पण वाचा.. एक वर्ष पूर्ण! ‘तू ही रे माझा मितवा’साठी शर्वरी जोगची खास पोस्ट

abhijit amkar Priyadarshini Indalkar marathi film