ADVERTISEMENT

“अभिजीत खांडकेकरचं मृण्मयी देशपांडेवर कौतुकाचा वर्षाव; म्हणाला काहीतरी खास…”

Abhijeet Khandkekar Mrunmayee Deshpande Mulakhat : लोकप्रिय अभिनेते अभिजीत खांडकेकरने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडेबद्दल खास भावना व्यक्त केल्या. मृण्मयीच्या नैसर्गिक अभिनयशैलीचा तो मोठा चाहता असून तिच्या डोळ्यांचा त्याला हेवा वाटतो, असं त्याने सांगितलं. या दोघांची जुनी आणि घट्ट मैत्रीदेखील या मुलाखतीत उलगडली.
Abhijeet Khandkekar Mrunmayee Deshpande Mulakhat

Abhijeet Khandkekar Mrunmayee Deshpande Mulakhat : मराठी मनोरंजनविश्वात आपल्या गोड हसण्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. झी मराठी वाहिनीवरील अलीकडील पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन करताना त्याने प्रेक्षकांची मने जिंकलीच, पण या सोहळ्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने अभिनेत्री मृण्मयी देशपांडेबद्दल खास भावना व्यक्त केल्या.

अभिजीत खांडकेकरने मृण्मयी देशपांडेच्या अभिनय कौशल्याचं कौतुक करताना म्हटलं, “ती ज्या सहजतेने भूमिकांमध्ये रमते, ते बघणं म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटणं असतं. तिचा अभिनय इतका नैसर्गिक आहे की अनेक वेळा तिला काही बोलावंही लागत नाही. फक्त तिच्या डोळ्यांतून भावना व्यक्त होतात. मला तिच्या त्या डोळ्यांचा प्रचंड हेवा वाटतो. माझे डोळे अगदी चिकूच्या बियांसारखे आहेत, पण तिच्या डोळ्यांत संपूर्ण भावना दिसतात. तिचा मला खूप अभिमान वाटतो.”

त्यांच्या दोघांची मैत्रीही खूप जुनी आहे. याविषयी बोलताना मृण्मयी देशपांडेने एक मजेदार आठवण सांगितली. ती म्हणाली, “मी जेव्हा खऱ्या आयुष्यात लग्नासाठी मुलं बघत होते, तेव्हा आम्ही नेहमी ओबेरॉयमध्ये भेटायचो. कुठे भेटायचं हे ठरलेलं असायचं. आमच्या दोन टेबल सोडून अभिजीत आणि सुखदा बसलेले असायचे. मुलगा कसा आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी ते तिथे असायचे. आमची मैत्री तेव्हापासून आहे आणि आजही ती तशीच घट्ट आहे.”

मृण्मयीने पुढे सांगितलं की अभिजीत हा तिचा असा मित्र आहे ज्याच्याशी ती कोणतीही गोष्ट निःसंकोच बोलू शकते. “मी काहीही सांगितलं तरी तो मला कधीच जज करत नाही आणि मीही त्याला नाही. ही आमच्या मैत्रीची खरी ताकद आहे,” असं तिने सांगितलं.

दरम्यान, मृण्मयी देशपांडे सध्या तिच्या दिग्दर्शित चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने दिग्दर्शित केलेला मनाचे श्लोक हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता. मात्र, या नावावरून काही ठिकाणी विरोध होताच प्रदर्शन तात्पुरते थांबवण्यात आलं. यानंतर १६ ऑक्टोबरला चित्रपट नव्या नावाने पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या प्रकरणात अनेक मराठी कलाकारांनी मृण्मयीला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे.

हे पण वाचा.. प्रियदर्शिनी इंदलकर म्हणते, “पर्यावरणाबाबतची जागरूकता बदलणे अत्यावश्यक”

अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे हे दोघे कलाकार केवळ पडद्यावरच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या या गोड मैत्रीमुळे आणि परस्पर सन्मानामुळे चाहत्यांमध्येही या जोडीबद्दल विशेष प्रेम आणि उत्सुकता आहे. मृण्मयीच्या अभिनयाबद्दल अभिजीतने केलेलं मनापासूनचं कौतुक आणि त्याचं तिच्या डोळ्यांबद्दलचं वक्तव्य आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

हे पण वाचा.. मृणाल ठाकूर पाहतेय आईसोबत ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका

Abhijeet Khandkekar Mrunmayee Deshpande Mulakhat