Aakash Nalawade wife छोट्या पडद्यावरील ‘साधी माणसं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेतील सत्या आणि मीराची जोडी प्रेक्षकांना खूप भावते. अभिनेता आकाश नलावडे आणि अभिनेत्री शिवानी बावकर या जोडीने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, मालिकेतील सत्या म्हणजेच आकाश नलावडेच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीबद्दल जाणून घेतलं, तर तीही तितकीच आकर्षक आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्व असलेली आहे.
आकाश नलावडेची पत्नी रुचिका धुरी कलाविश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर मात्र ती कायम चर्चेत असते. साधी, सोज्वळ पण मनमोहक व्यक्तिमत्त्वामुळे रुचिका चाहत्यांच्या नजरेत भरते. आकाशप्रमाणे तीही सोशल मीडियावर सक्रीय असून, तिचे फोटोज अनेकदा चर्चेत राहतात.
गणेशोत्सवानिमित्ताने नुकतेच आकाश नलावडेने आपल्या घरातील बाप्पाची झलक सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याच्या पत्नी रुचिकाही दिसत असल्याने चाहत्यांनी या जोडप्याचं भरभरून कौतुक केलं. त्यांच्या साध्या पण आकर्षक अंदाजामुळे चाहत्यांनी “ही जोडी खरंच परफेक्ट” अशी कमेंट्स केल्या.
हे पण वाचा.. बँक बॅलेन्सच्या दुप्पट मानधनाची ऑफर मिळूत असूनही अमृता सुभाषने नाकारली भूमिका?..म्हणाली-
कलाकार आकाश नलावडे सोशल मीडियावर कायमच त्याच्या व्यावसायिक जीवनासोबत वैयक्तिक आयुष्याचेही किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्यामुळे त्याच्या पोस्ट्सला प्रचंड प्रतिसाद मिळतो. विशेष म्हणजे, ‘साधी माणसं’ मालिकेतील मीरासोबतच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच खऱ्या आयुष्यातील रुचिका धुरीसोबतचा त्याचा बॉन्डही चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरत असतो.
रुचिका ही ग्लॅमर वर्ल्डपासून दूर असूनही साधेपणामुळे नेहमी चर्चेत राहते. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होत असतो. अनेकांना ती मालिकेतील मीरा इतकीच सुंदर वाटते. त्यामुळे मालिकेतील सत्या-मीराच्या जोडीसोबतच खऱ्या आयुष्यातील आकाश-रुचिकाची जोडीही चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान मिळवत आहे.
हे पण वाचा.. नारायणी शास्त्रीचा भीक मागतानाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का काय आहे व्हिडीओ मागील सत्य?









