aai kuthe kay karte fame apurva gore wedding confirmed : -मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नसराईचा माहोल पाहायला मिळतो आहे. अनेक लोकप्रिय कलाकार आपापल्या नात्यांना पुढील टप्प्यावर नेत लग्नाची घोषणा करत आहेत. याच यादीत आता छोट्या पडद्यावरील आणखी एका लाडक्या अभिनेत्रीचं नाव सामील झालं आहे. ‘आई कुठे काय करते’ या सुपरहिट मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी Apurva Gore लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलं आहे.
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत Apurva Gore हिनं अरुंधतीची धाकटी मुलगी ‘ईशा’ ही भूमिका साकारली होती. समजूतदार, शांत आणि भावूक स्वभावाच्या ईशाच्या भूमिकेमुळे अपूर्वाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हीच लोकप्रिय अभिनेत्री आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील सुंदर टप्प्याची सुरुवात करत आहे.
अपूर्वानं नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. हिरव्या रंगाची साडी, गळ्यात नाजूक ठुशी आणि हातात गुलाबाचं फूल असा पारंपरिक आणि मोहक लूक करत तिनं होणाऱ्या पतीसह फोटोशूट केलं आहे. या फोटोंना “ठरलं! चाफा आणि तो… मला खूप आवडतात…” असं भावूक आणि काव्यात्म कॅप्शन देत तिनं तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
मात्र, या सगळ्या आनंदाच्या क्षणांमध्ये एक गूढतेचा भागही आहे. अपूर्वानं तिच्या होणाऱ्या जोडीदाराचा चेहरा अद्याप रिव्हिल केलेला नाही. प्रत्येक फोटोमध्ये त्याचा चेहरा गुलदस्त्यात किंवा वेगळ्या पद्धतीनं लपवण्यात आला आहे. त्यामुळे Apurva Gore च्या आयुष्यातील ‘तो’ नेमका कोण, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.
या पोस्टवर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुकन्या मोने, अश्विनी महांगडे, शुभंकर एकबोटे, ऐश्वर्या शेटे, अदिती द्रविड यांसारख्या कलाकारांनी अपूर्वाला भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हे पण वाचा.. आता आईचा फोन कधीच येणार नाही भाग्यश्री न्हालावे ची भावुक पोस्ट
दरम्यान, Apurva Gore च्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या ‘शेवग्याच्या शेंगा’ या लोकप्रिय नाटकात ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्यासोबत काम करत आहे. आता तिच्या लग्नाची तारीख आणि होणाऱ्या नवऱ्याची ओळख कधी उघड होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या ‘ईशा’साठी हा नवा प्रवास नक्कीच खास ठरणार आहे.
हे पण वाचा.. तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा खास रियुनियन; शिवानी रांगोळेने शेअर केले भावूक क्षण









