aai kuthe kay karte apurva gore lagna anshuman joshi : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळत असून अनेक लोकप्रिय कलाकार नव्या आयुष्याची सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत. याच आनंदाच्या यादीत आता ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री Apurva Gore हिचं नावही सामील झालं आहे. काही दिवसांपूर्वीच अपूर्वाने तिचं लग्न ठरल्याची माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली होती. मात्र, त्यावेळी होणाऱ्या पतीचा चेहरा न दाखवल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
अपूर्वा गोरेने सुरुवातीला शेअर केलेल्या फोटोंमध्ये फक्त गुलदस्त्याआड लपलेला ‘अहों’ दिसत होता. “चाफा आणि तो… मला खूप आवडतात” असं कॅप्शन देत तिने प्रेमळ अंदाजात पोस्ट शेअर केली होती. पण तिचा जोडीदार नेमका कोण, हा प्रश्न चाहत्यांना सतावत होता. अखेर ही उत्सुकता संपली असून, अपूर्वाने आता कुटुंबीयांसोबतचे खास फोटो शेअर करत होणाऱ्या पतीची ओळख जाहीर केली आहे.
Apurva Gore लवकरच अभिनेता अंशुमन जोशीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. अंशुमन जोशीने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या ‘शाळा’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनयासोबतच अंशुमन दिग्दर्शन, लेखन, चित्रलेखन आणि छायाचित्रण या क्षेत्रातही सक्रिय आहे. त्यामुळे हा विवाह केवळ दोन व्यक्तींचाच नव्हे, तर दोन सर्जनशील कलाविश्वांचा सुंदर संगम मानला जात आहे.
होणाऱ्या जोडीदारासोबत फोटो शेअर करताना अपूर्वाने भावुक शब्दांत लिहिलं आहे की, “आनंदघन येई घरा… हा आहे गोरेंचा जावई आणि मी आहे जोश्यांची सून.” दोन्ही कुटुंबांनी दिलेलं निःस्वार्थ प्रेम आणि पाठिंबा याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. या फोटोंमध्ये गोरे आणि जोशी कुटुंबीयांची आपुलकी आणि आनंद स्पष्टपणे दिसून येतो.
या पोस्टवर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ऐश्वर्या नारकर, दिपाली पानसरे, अश्विनी कासार यांसह अनेक चाहत्यांनी Apurva Gore च्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे पण वाचा.. गळ्यातून सूर…भैरवीचा डाव यशस्वी ठरणार का? सावळ्याची जणू सावली मालिकेत सावलीवर मोठं संकट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर Apurva Gore सध्या ‘शेवग्याच्या शेंगा’ या लोकप्रिय नाटकात कार्यरत आहे. यामध्ये तिच्यासोबत ऐश्वर्या आणि अविनाश नारकर महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. याशिवाय ‘आई कुठे काय करते’ या सुपरहिट मालिकेतील ईशा ही भूमिका तिच्या करिअरमधील संस्मरणीय ठरली. आता वैयक्तिक आयुष्यातील हा नवा टप्पा तिच्या चाहत्यांसाठीही खास ठरणार आहे.
हे पण वाचा.. Mi Savitribai Jotirao Phule: जोतीराव-सावित्रीचा ऐतिहासिक विवाह, मालिकेत रंगणार परंपरा, संघर्ष आणि भावनांचा संगम







