ADVERTISEMENT

‘अभंग तुकाराम’मध्ये Ajinkya Raut झळकणार; दिग्पाल लांजेकरची भक्तीमय सिनेमाट्रीप तयार

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर लवकरच ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Ajinkya Raut

मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक व प्रेरणादायी विषयांवर उत्कृष्ट चित्रपट सादर करणारे दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ‘फर्जंद’पासून ‘जंगजाऊर’पर्यंतच्या चित्रपटांतून त्यांनी इतिहास, पराक्रम आणि प्रेरणेचा संगम घडवून आणला आहे. आता ते भक्तिरस आणि अध्यात्माचा सोहळा मोठ्या पडद्यावर साकारत आहेत. त्यांचा आगामी चित्रपट ‘अभंग तुकाराम७ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

अभंग तुकाराम’ हा चित्रपट संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून प्रकट झालेली भक्ती, समाजप्रबोधनाचा संदेश आणि जीवनमूल्ये यांचा सखोल आढावा या चित्रपटात घेतला जाणार आहे. दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली. या पोस्टरवर “भक्ती, प्रेरणा आणि चैतन्याचा सोहळा” अशी टॅगलाईन देण्यात आली असून, पाहताक्षणीच प्रेक्षकांच्या मनात एक आगळंवेगळं भक्तिमय वातावरण तयार होतं.

या चित्रपटात मराठी मनोरंजनविश्वातील अनेक मान्यवर कलाकार झळकणार आहेत. Ajinkya Raut सोबतच विराजस कुलकर्णी, तेजस बर्वे, अभिजीत श्वेतचंद्र, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, निखील राऊत यांचा सहभाग आहे. तसेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. Ajinkya Raut ने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ‘अभंग तुकाराम’ची माहिती दिली असून, चाहत्यांनी त्याला मुख्य भूमिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Ajinkya Raut हा मराठी मालिकाविश्वातील ओळखीचा चेहरा आहे. त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली आहे. त्यामुळे तो संत तुकारामांच्या भूमिकेत दिसणार का, हा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. विराजस कुलकर्णी व तेजस बर्वे यांनाही या पोस्टमध्ये टॅग करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांच्या भूमिकांबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे पण वाचा.‌ Gashmeer Mahajani ची क्रश कोण? अभिनेता म्हणतो, “आतासुद्धा माझ्यासाठी खास…

दिग्पाल लांजेकर यांचा दिग्दर्शनातला प्रवास नेहमीच ऐतिहासिक व सांस्कृतिक विषयांच्या जवळ राहिला आहे. अलीकडेच त्यांनी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला होता. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. ‘अभंग तुकाराम’सह ते आता भक्तिरसात बुडालेला आणि समाजाला प्रेरणा देणारा सिनेमा घेऊन येत आहेत.

चित्रपटाची कथा योगेश सोमण यांनी लिहिली असून, पटकथा स्वतः दिग्पाल लांजेकर यांनी तयार केली आहे. ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या कथांना पडद्यावर साकारताना वास्तवतेला प्राधान्य देणारा दिग्पाल यांचा दृष्टिकोन ‘अभंग तुकाराम’मध्येही दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.

मोशन पोस्टर पाहूनच चित्रपटाच्या भव्यतेची आणि गंभीरतेची झलक मिळते. संत तुकाराम महाराजांची विचारसरणी आणि अभंगांची परंपरा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. दिग्पाल यांच्या दिग्दर्शनातून हे कार्य सिनेमाच्या माध्यमातून प्रभावीपणे साध्य होईल, असा विश्वास प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

हे पण वाचा.. Vedio: किती गोड क्षण! रिंकू राजगुरूचा श्वानाच्या पिल्लांबरोबरचा व्हिडीओ व्हायरल; अभिनेत्रीचे भावनिक शब्द चाहत्यांच्या मनाला भिडले

७ नोव्हेंबरला ‘अभंग तुकाराम’ प्रदर्शित होणार असल्याने, मराठी सिनेरसिकांना एका भक्तिमय प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. Ajinkya Raut सारखा लोकप्रिय आणि सक्षम अभिनेता यात असल्याने चित्रपटाबद्दलची अपेक्षा आणखी वाढली आहे.

Ajinkya Raut इंस्टाग्राम पोस्ट..