ADVERTISEMENT

Gashmeer Mahajani ची क्रश कोण? अभिनेता म्हणतो, “आतासुद्धा माझ्यासाठी खास…

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) नुकताच चाहत्यांशी सोशल मीडियावर संवाद साधताना त्याच्या खास आवडी-निवडींवर बोलला. त्याने आपल्या ‘क्रश’चं नाव घेत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला, तसेच पत्नीबाबतही एक मजेदार टिप्पणी केली.
Gashmeer Mahajani

मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या अभिनयशैलीमुळे आणि देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा नावाजलेला अभिनेता आहे. मराठी चित्रपट, हिंदी मालिकांपासून वेब सिरीजपर्यंत त्याने केलेली कामगिरी चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहे. ‘सुर्यपुत्र करणाराज’ आणि ‘देवक’सारख्या चित्रपटांबरोबरच, ‘इमली’ या हिंदी मालिकेतल्या भूमिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडली.

Gashmeer Mahajani सोशल मीडियावर अधूनमधून सक्रिय असतो आणि आपल्या चाहत्यांशी थेट संवाद साधण्याची संधी तो गमावत नाही. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी क्वेश्चन’ सेशन घेतलं. या दरम्यान चाहत्यांनी त्याला वैयक्तिक जीवनापासून करिअर, आगामी प्रोजेक्ट्स, तसेच काही हलक्याफुलक्या विषयांवर प्रश्न विचारले.

Gashmeer Mahajani ची ‘क्रश’ कोण?

सेशनमधील सर्वात चर्चेत राहिलेला प्रश्न म्हणजे, “मराठी चित्रपटसृष्टीत तुझी क्रश कोण आहे?” गश्मीरने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, “मला वाटतं, आश्विनी भावे मॅडम त्यांच्या काळातील आणि आतासुद्धा माझी क्रश आहेत.” या उत्तरावरून स्पष्ट होतं की, सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि देखण्या अभिनेत्री आश्विनी भावे यांच्याबद्दल त्याला आजही तितकाच आदर आणि आकर्षण आहे.

पत्नीबद्दलचा मजेदार खुलासा

याच संवादादरम्यान, एका चाहत्याने Gashmeer Mahajani ला विचारलं की, “तुझी आवडती सहअभिनेत्री कोण?” त्यावर गश्मीरने हसत उत्तर दिलं, “माझी पत्नी. ती खूप अभिनय करते.” त्याच्या या उत्तरासोबत त्याने हसण्याचे इमोजीही शेअर केले. हा हलका-फुलका किस्सा चाहत्यांमध्ये भरपूर चर्चेत आला.

सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचं कारण

काही चाहत्यांनी विचारलं की, तो सोशल मीडियावर फारसा दिसत का नाही? त्यावर Gashmeer Mahajani ने सांगितलं, “मी सध्या माझ्या एका चित्रपटावर काम करतो आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायला बराच वेळ लागत आहे. त्यामुळे मी सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घेतला आहे.”

एका चाहत्याने विचारलं की, “जेव्हा तुला घाबरल्यासारखं वाटतं, तेव्हा तू काय करतोस?” यावर गश्मीरचं साधं उत्तर होतं, “मी सोशल मीडियापासून ब्रेक घेतो.”

हे पण वाचा.. Vedio: किती गोड क्षण! रिंकू राजगुरूचा श्वानाच्या पिल्लांबरोबरचा व्हिडीओ व्हायरल; अभिनेत्रीचे भावनिक शब्द चाहत्यांच्या मनाला भिडले

आयुष्यातील कठीण काळ हाताळण्याची पद्धत

जीवनात आलेल्या आव्हानांबद्दल बोलताना Gashmeer Mahajani म्हणाला, “समस्या आजही आहेत, पण कुटुंब सोबत असेल तर त्या परिस्थितीला तोंड देणं सोपं जातं. माझ्या कुटुंबाने मला त्या काळात साथ दिली.” हे उत्तर ऐकून चाहत्यांनी त्याच्या कुटुंबातील घट्ट नात्याचं कौतुक केलं.

चाहत्यांसाठी टिप्स

अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही सल्ला द्या, असं विचारल्यावर गश्मीरने मिश्कील उत्तर दिलं, “मला विसरा, तुमच्या समस्या आपोआप सुटतील.” त्याच्या या विनोदी उत्तरावर चाहत्यांनीही हसून प्रतिसाद दिला.

Gashmeer Mahajani केवळ त्याच्या अभिनयासाठीच नव्हे तर त्याच्या मोकळ्या स्वभावासाठी, विनोदी शैलीसाठी आणि प्रामाणिक उत्तरांसाठीही चाहत्यांच्या मनात खास स्थान मिळवून आहे. आता तो कोणत्या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

हे पण वाचा.. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारावर Amey Wagh ची प्रतिक्रिया म्हणाला..