ADVERTISEMENT

Vedio: किती गोड क्षण! रिंकू राजगुरूचा श्वानाच्या पिल्लांबरोबरचा व्हिडीओ व्हायरल; अभिनेत्रीचे भावनिक शब्द चाहत्यांच्या मनाला भिडले

vedio: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) नुकताच सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे. श्वानाच्या लहान पिल्लांबरोबर खेळताना टिपलेले हे दृश्य आणि तिने लिहिलेली भावनिक कॅप्शन चाहत्यांना भावून गेली आहे.
Vedio

Viral video: मराठी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे असतात, ज्यांच्या पहिल्याच चित्रपटातून त्यांची ओळख संपूर्ण राज्यभरच नव्हे तर जगभर पसरते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (Rinku Rajguru). २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटातून तिने ‘आर्ची’ची भूमिका साकारत लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने तिला घराघरात पोहोचवलं आणि तिचं करिअर नव्या उंचीवर नेलं.

‘सैराट’नंतर रिंकूने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत अभिनयाची छाप सोडली. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तिला ‘आशा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले होते. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि इतर कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

अभिनयासोबतच रिंकू सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांशी संवाद साधत, फोटो आणि Video शेअर करत असते. अलीकडेच तिने शेअर केलेला एक खास व्हिडीओ मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू श्वानाच्या लहान पिल्लांबरोबर खेळताना दिसते.

विशेष म्हणजे, तिच्या जवळ एक-दोन नव्हे तर अनेक पिल्लं दिसत आहेत. रिंकू पुढे चालत असताना ही लहान पिल्लं तिच्या मागे धावत येतात आणि तीही त्यांच्या खेळात मनापासून रमते. तिच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद व्हिडीओतून स्पष्ट दिसतो.

हे पण वाचा.. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारावर Amey Wagh ची प्रतिक्रिया म्हणाला..

हा Video शेअर करताना रिंकूने लिहिलेली कॅप्शन चाहत्यांच्या मनाला भिडली. तिने लिहिलं, “ते कधीच एक शब्दही बोलत नाहीत. पण तरीही त्यांनी मला निस्सीम प्रेमाची भाषा शिकवली आहे.” या थोडक्यात पण प्रभावी वाक्यांनी तिने आपलं भावविश्व मांडलं आणि प्रेक्षकांच्या हृदयाला हात घातला.

सोशल मीडियावर हा Video पाहताच चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी हार्ट इमोजी टाकत तिच्यावर आपुलकी व्यक्त केली, तर काहींनी पिल्लांच्या गोडवेगळी हालचाल पाहून आनंद व्यक्त केला.

रिंकूच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच ‘बेटर हाफची लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुबोध भावे आणि प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत दिसतील. हा चित्रपट २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षक या नव्या प्रेमकथेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हे पण वाचा.. Prajakta Mali :पुण्यातील येरवडा महिला कारागृहाला भेट सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत म्हणाली..

रिंकूचा हा Video आणि त्यामागची भावना केवळ तिच्या चाहत्यांनाच नव्हे तर प्राणीप्रेमींसाठीही प्रेरणादायी ठरली आहे. भाषेची गरज नसतानाही प्रेम व्यक्त करता येतं, याचं जिवंत उदाहरण तिने आपल्या या साध्या पण गोड क्षणातून दिलं आहे.

Rinku Rajguru’s dog puppy Instagram Video