झी मराठीवर नुकतीच सुरू झालेली ‘Veena Doghantli Hi Tutena’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. ११ ऑगस्टपासून प्रसारित होणाऱ्या या मालिकेत मराठीतील लोकप्रिय जोडी तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि सुबोध भावे — पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत. तेजश्री मालिकेत स्वानंदी सरपोतदार ही भूमिका साकारत असून, सुबोध समर राजवाडे या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना भेटत आहे. मालिकेच्या पहिल्याच भागानंतर चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
या मालिकेच्या निमित्ताने एक विशेष किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. लोकप्रिय गायिका सावनी रवींद्र हिने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेसाठी शीर्षकगीत गायले असून, याबाबत तिने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
सावनीने इंस्टाग्रामवर तेजश्री प्रधानसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं, “१२ वर्षांपूर्वी तेजूचा आवाज बनून घराघरांत पोहोचले… ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने आणि त्यातल्या गाण्यांनी इतिहास घडवला. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी पुन्हा तेजूसाठी गाण्याची संधी मिळाली. यावेळी निमित्त आहे Veena Doghantli Hi Tutena’ या नवीन मालिकेच्या शीर्षकगीताचं. मोरया चरणी प्रार्थना करते की या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा इतिहास घडावा.”
सावनी आणि तेजश्री यांचं नातं केवळ व्यावसायिक नसून, त्यामध्ये परस्परांचा सन्मान आणि जिव्हाळाही आहे. २०१२ मध्ये ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं होतं. त्या मालिकेतील गाणी आणि सावनीचा स्वर घराघरांत गुंजत होता. त्या काळातील यशस्वी जोडी आता नव्या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांना भेटत आहे, ही चाहत्यांसाठीही भावूक करणारी बाब आहे.
हे पण वाचा.. Gautami Kapoor : बस प्रवासातील भयावह अनुभवावर खुलासा “त्या दिवशी समजलंच नाही माझ्यासोबत काय घडलं”
या पोस्टमध्ये सावनीने झी मराठी वाहिनी, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र आणि गीतकार वैभव जोशी यांचे आभार मानले आहेत. याशिवाय, या गाण्यासाठी तिला ‘बिग बॉस मराठी ५’ फेम अभिजीत सावंतची साथ मिळाल्याचाही तिने खास उल्लेख केला. “अभिजीतसोबत गाण्याची मजा काही औरच,” असं सावनीने लिहिलं.
‘Veena Doghantli Hi Tutena’ ही मालिका केवळ कथानकामुळेच नाही तर तिच्या शीर्षकगीतामुळेही चर्चेत आहे. तेजश्री प्रधानच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या भूमिका आहेत, मात्र या मालिकेतील तिचा कमबॅक चाहत्यांना विशेष भावत आहे. सुबोध भावेसोबतची तिची जोडी आधीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, या वेळीदेखील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या हृदयात घर करण्याची शक्यता आहे.
सावनी रवींद्रसारख्या दमदार आवाजाच्या गायिकेने पुन्हा एकदा तेजश्री प्रधानच्या व्यक्तिरेखेला आपला स्वर दिल्याने मालिकेच्या भावनिक बाजूस आणखी उंची मिळाल्याचं मानलं जातं. एकीकडे प्रेक्षकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आहे, तर दुसरीकडे नवीन कथानकाचा ताजेपणाही अनुभवता येतो आहे.
हे पण वाचा.. ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम Vallari Viraj ची आदर्श अभिनेत्री उघड; प्रियांका चोप्राबद्दल म्हणाली…
मालिकेच्या प्रारंभानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी सावनी आणि तेजश्रीच्या या पुनर्भेटीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. काहींनी याला “१२ वर्षांनी झालेला गोड संगम” असं म्हटलं, तर काहींनी ‘होणार सून मी ह्या घरची’च्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्याचं सांगितलं.
या मालिकेच्या यशामध्ये कथा, कलाकार आणि तांत्रिक टीमबरोबरच संगीताचं योगदानही तितकंच महत्त्वाचं असणार आहे, आणि सावनी रवींद्रचा गोड, भावपूर्ण आवाज त्याला निश्चितच एक वेगळीच ओळख देणार आहे.









