मराठी टेलिव्हिजनवर नेहमीच नवनवीन आणि हटके कथा प्रेक्षकांच्या मनात घर करतात. झी मराठीच्या नव्या मालिकांमध्ये ‘तारिणी’ ही एक अशी मालिका आहे, जी आपल्या वेगळ्या आशयामुळे आणि दमदार सादरीकरणामुळे चर्चेत आली आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत असलेली शिवानी सोनार (Shivani Sonar) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, या भूमिकेसाठी तिने खांद्याच्या दुखापतीतही अॅक्शन सीन पूर्ण केले असून, तिच्या या समर्पणाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
अभिनेत्री Shivani Sonar ने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘तारिणी’ मालिकेचा अनुभव उलगडला. “हो, खांद्याला थोडी दुखापत झाली आहे, पण हळूहळू बरी होत आहे. ही भूमिका मला मिळणं ही खूप मोठी संधी आहे. पोस्टर जाहीर झाल्यापासूनच अनेकांनी कौतुकाचे संदेश पाठवले. इंडस्ट्रीमधील अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं की, ‘ही भूमिका तू सहज करू शकतेस.’ कधी कधी आपल्याला स्वतःवर शंका येते, पण इतरांचा विश्वास आपल्याला अधिक ताकद देतो,” असं ती म्हणाली.
Shivani Sonar सांगते की, पहिला प्रोमो प्रसारित झाल्यानंतरच प्रेक्षकांनी तिला ‘तारिणी’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली. “जेव्हा एखाद्या पात्राच्या नावाने लोक तुम्हाला ओळखतात, तेव्हा तो कलाकार म्हणून जिंकलेला क्षण असतो. या मालिकेत ते पहिल्याच प्रोमोमध्ये झालं आणि ही भावना अप्रतिम आहे,” ती आनंदाने म्हणाली.
भूमिकेसाठी झालेल्या ऑडिशनची आठवण सांगताना Shivani Sonar ने हसत हसत खुलासा केला, “ऑडिशनमध्ये फक्त अॅक्शन सीन दाखवायला सांगितलं होतं. मी सहजपणे लाथ मारली, बस्स! काही विशेष नाट्यमय तयारी केली नव्हती, पण ती साधी कृतीच कदाचित कास्टिंग टीमच्या मनात भरली.”
मालिकेच्या प्रोमोवर तिचा पती अंबर गणपुळे याची प्रतिक्रिया मात्र खास होती. “अंबर खूप चोखंदळ प्रेक्षक आहे. प्रोमो पाहून त्याने लगेच प्रतिक्रिया दिली, ‘बापरे! अगदी धतिंग शूटिंग करते आहेस तू!’ त्याला प्रोमो फार आवडला आणि त्याने सांगितलं, ‘जे काही करशील ते उत्तम कर, पण सांभाळून कर.’ ही त्याची काळजी आणि पाठिंबा दोन्ही एकत्र मिळाल्याचा क्षण होता,” शिवानीने सांगितलं.
हे पण वाचा.. ‘लाखात एक आमचा दादा’ फेम Disha Pardeshi ची नवी इनिंग; निर्माती म्हणून ‘वर वरचे स्वयंवर’सह करणार पदार्पण
फक्त पतीच नव्हे, तर तिची आई आणि सासूबाईही मालिकेबद्दल तितक्याच उत्सुक आहेत. “नऊवारी साडीत अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार असल्याने घरच्यांमध्येही उत्साह आहे. घरातील प्रत्येक सदस्य या प्रवासात माझ्यासोबत आहे, हीच माझी खरी ताकद आहे,” ती म्हणाली.
‘तारिणी’ मालिकेत पारंपरिक वेशभूषा आणि दमदार अॅक्शनचा संगम दिसणार आहे. यामुळे केवळ कथानकच नव्हे, तर अभिनयाच्या आव्हानात्मक बाजूंमध्येही प्रेक्षकांना काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार आहे. Shivani Sonar ची ही भूमिका तिच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, याबद्दल मात्र चाहत्यांमध्ये पूर्ण खात्री आहे.
या भूमिकेसाठी लागणाऱ्या शारीरिक मेहनतीपासून ते भावनिक समर्पणापर्यंत, शिवानीने ‘तारिणी’च्या प्रवासाला पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आहे. आणि म्हणूनच, मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ११ ऑगस्टपासून प्रसारित होणारी ही मालिका शिवानीच्या कारकिर्दीतील एक संस्मरणीय पर्व ठरेल, यात शंका नाही.
हे पण वाचा.. “गेली नऊ वर्षे सोबत…” Dnyanada Ramtirthkar ने मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली भावनिक पोस्ट









