मराठी सिनेमा आणि रंगभूमीवर स्वतःची वेगळी छाप उमटवणारा अभिनेता Santosh Juvekar यांना नुकतच महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘रावरंभा‘ या चित्रपटातील त्यांच्या जालिंदर भूमिकेसाठी ६१व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारात Santosh Juvekar ला ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता’ म्हणून गौरवण्यात आले. या पुरस्कारामुळे त्यांच्या कर्तृत्वाला अधिक दृढता मिळाली असून त्यानी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना आणि सहकाऱ्यांना धन्यवाद दिला आहे.
Santosh Juvekar यानी ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘शाळा’, ‘बॉईज’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले असून मराठी चित्रपट क्षेत्राबरोबरच हिंदी चित्रपटातही त्यांची ओळख आहे. यावर्षी विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली.
हे पण वाचा.. Jahnavi Killekar “त्याच्या लग्नाचा विडा मी उचललाय” – विवेक सांगळेच्या लग्नाविषयी खास प्रतिक्रिया
अभिनय क्षेत्रातील त्याच्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळणं हा त्यांच्यासाठी खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे. Santosh Juvekar याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “ज्यासाठी केला अट्टाहास! या काळ्या बाहुल्या नशिबानं मिळतात; पण हे नशीब घडतं, ते आपल्या कामावर असलेल्या श्रद्धा आणि प्रयत्नांमुळे. तसंच त्या प्रयत्नांवरील नटेश्वराचा आशीर्वाद आणि मायबाप प्रेक्षकांची मिळालेली शाबासकीची पाठीवर थाप आणि नितांत प्रेम… बस्स, मग सगळं शक्य झालंच समजा.”
Santosh Juvekar ने आपल्या पोस्टद्वारे महाराष्ट्र राज्य मराठी रंगभूमी आणि चित्रपट सांस्कृतिक कार्यकारी विभाग, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सांस्कृतिक मंत्री यांचे तसेच ‘रावरंभा’ चित्रपटातील सर्व टीमचे मनापासून आभार मानले आहेत.
या पुरस्कारानंतर संतोषला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा आणि कौतुक मिळत आहे. सोशल मीडियावर “खूप खूप अभिनंदन”, “दादा खूप प्रगती कर”, “तुझ्यापाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे” अशा अनेक अभिप्रायांनी त्याला उत्साह देत आहेत.
Santosh Juvekar याचा हा विजय त्यांच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा फलित आहे, ज्यामुळे त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत एक यशस्वी स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्सची चाहत्यांना आतुरता आहे, तसेच या अभिनेत्याचे उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.









