मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक Kedar Shinde यांनी त्यांच्या ‘झापुक झुपूक’ या सिनेमाच्या अपयशावर दिलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी प्रेक्षकांनी हा सिनेमा नाकारल्याचे कारण “माझ्यातच काहीतरी खोट आहे” असं नमूद करत, अप्रत्यक्षपणे प्रेक्षकांचीच जबाबदारी असल्याचा सूर लावला होता. मात्र, आता या वक्तव्यावर दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा आणि अभिनेता वरद चव्हाण याने थेट व्हिडीओद्वारे Kedar Shinde ना सुनावलं आहे.
वरद चव्हाणने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करत Kedar Shinde यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. “तुम्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षं आहात, यश-अपयश पाहिलंय. पण ‘झापुक झुपूक’च्या अपयशावर अशा प्रकारचं विधान करणं हे थोडं विचित्र वाटतं,” असं वरद म्हणाला. त्याच्या मते, प्रेक्षकांनी आधीच या सिनेमाला नाकारलं होतं आणि विशेषतः सूरज चव्हाणला हिरो म्हणून स्वीकृती दिलेली नव्हती.
‘झापुक झुपूक’च्या ट्रेलरपासूनच प्रेक्षकांचा नकार स्पष्ट होता, असं वरदचं स्पष्ट मत आहे. Kedar Shinde हे अपयश मान्य करत नाहीत, ही गोष्ट खटकणारी असल्याचं त्याने म्हटलं. “जर तुम्हाला हे पचत नसेल, तर जे लोक तुम्हाला आदर्श मानतात, त्यांनी काय करायचं?” असा प्रश्नही त्याने उपस्थित केला.
हे पण वाचा.. ‘झापुक झुपूक’च्या अपयशावर Kedar Shinde भावुक; म्हणाले, “माझ्यातच काहीतरी खोट असावी…”
याशिवाय, वरदने ‘बिग बॉस’मध्ये सूरज चव्हाणच्या एन्ट्रीनंतर घडलेल्या गोष्टींचाही उल्लेख केला. सूरजच्या घरात येण्यापूर्वीच तो केदार शिंदेंच्या आगामी सिनेमाचा हिरो असल्याचं जाहीर झालं होतं. या पार्श्वभूमीवर, वरदने केदार शिंदे आणि कलर्स मराठीच्या भूमिकेबाबत सूचक टिप्पणी केली. त्याचबरोबर, सूरजचा प्रवास कौतुकास्पद आहे, हेही त्याने मान्य केलं; मात्र प्रेक्षकांनी त्याला हिरो म्हणून स्वीकारलं नाही, हे वास्तवही स्पष्ट केलं.
Kedar Shinde नी इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये ट्रोलर्सबद्दल वेळोवेळी बोलल्यावरही वरदने टीका केली. “तुम्ही म्हणता की ट्रोलर्सकडे लक्ष देत नाही, पण त्याच ट्रोलर्सच्या कमेंट्स तुम्ही पाऊणतास वाचून दाखवत होतात,” असा थेट आरोप त्याने केला. वरदच्या मते, केदार शिंदे यांनी हे इन्स्टाग्राम लाईव्ह समजूतदारपणे हाताळायला हवं होतं, किंवा टाळायचं होतं.
याच व्हिडीओत वरदने असा दावाही केला की, सूरज चव्हाणबाबत पीआर टीमने अतिरेक केला होता. “त्याची तुलना दादा कोंडकेंशी करणं म्हणजे अतिशयोक्ती होती. प्रेक्षक हे स्वीकारत नाहीत,” असं स्पष्ट करत त्याने सिनेमा ९९ रुपयांत दाखवण्याचा निर्णयही फोल ठरला असल्याचं म्हटलं.
हे पण वाचा.. Vedio: ‘Pinga Ga Pori Pinga’ फेम अभिनेत्रीला पायाला गंभीर दुखापत; प्लास्टर बांधूनही केली शूटिंगची तयारी!
मराठी सिनेमांच्या दर्जाबाबतही वरदने परखड मत मांडलं. “मराठी माणूस २००० रुपये देऊन दाक्षिणात्य किंवा हिंदी सिनेमा बघतो, पण मराठी सिनेमासाठी का चाचपडतो? कारण आपले सिनेमे त्या दर्जाचेच नसतात. हे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी स्वीकारायला हवं,” असं ठामपणे सांगत त्याने केदार शिंदे यांना इशारा दिला की, प्रेक्षकांवर खापर फोडणं थांबवा.
शेवटी वरदने असंही सुचवलं की, ‘झापुक झुपूक’चं नशीब वेगळं होतं, ‘सही रे सही’सारखं नव्हतं, आणि त्यावर स्पष्टीकरणं देत बसण्यात काही अर्थ नाही. “तुम्ही आदरणीय आहात, पण एक चूक सगळ्या चांगल्या कामावर पाणी सोडू शकते. त्यामुळे बालिशपणा करू नका, चूक स्वीकारा आणि पुढे जा,” असं त्याने शेवटी नम्रपणे पण ठामपणे सांगितलं.
या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते – मराठी सिनेसृष्टीत आता प्रेक्षकांचं मत नाकारता येणार नाही. सिनेमाचा दर्जा, कास्टिंग, आणि सोशल मीडियावरील वावर या सगळ्या गोष्टी गंभीरपणे घ्यायला हव्यात. अन्यथा, Kedar Shinde यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांनाही त्यांच्या अनुभवांवर पाणी फेरावणाऱ्या प्रसंगांना सामोरं जावं लागू शकतं.









