मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान, संवेदनशील आणि विविध भूमिका आपल्या अभिनयातून साकारणारी अभिनेत्री Mukta Barve हिला नुकताच चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे. ६० आणि ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला, आणि या दिमाखदार सोहळ्यात मुक्ताचा गौरव करण्यात आला. यानंतर तिच्या भावनिक प्रतिक्रियेनं चाहत्यांची आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांची मनं जिंकली आहेत.
Mukta Barve ने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, “हा पुरस्कार मिळणं म्हणजे खूप मोठा मान आहे. विशेषतः चित्रपती व्ही. शांताराम यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. महाराष्ट्र शासनाने माझ्या अभिनयाच्या सुरुवातीपासूनच मला प्रोत्साहन दिलं. ‘चकवा’ या पहिल्याच चित्रपटासाठी पदार्पणाचं पारितोषिक मिळालं आणि आता जवळपास पंचवीस वर्षांनंतर माझ्या सर्व कारकिर्दीचं असं कौतुक होतंय, याचा मला खूप आनंद आहे.”
या क्षणी केवळ तिचं वैयक्तिक यश नाही, तर ती प्रेक्षकांना सुद्धा सहभागी करते. “हा पुरस्कार घेतेवेळी मला जाणवलं की माझ्यासोबत माझ्यावर विश्वास ठेवणारे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार आणि अर्थातच माझे प्रेक्षकही या गौरवाचे मानकरी आहेत,” असं सांगून तिने तिच्या यशात इतरांचे योगदान अधोरेखित केलं.
हे पण वाचा..“Amruta Khanvilkar ला पहिला राज्य पुरस्कार; ‘चंद्रमुखी’साठी मिळाला सर्वोच्च गौरव”

Mukta Barve ने ‘बाहुली’ म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराची ट्रॉफी मिळवण्याचा आनंदही व्यक्त केला. “ती ट्रॉफी इतकी सुंदर आहे की, तिच्या मिळवण्यासाठी कलाकार जीव ओवाळून टाकतो. या ट्रॉफीची तुलना कुठल्याही इतर भाषेतील पुरस्काराशी होऊ शकत नाही. माझ्या मातीतल्या कामाचं कौतुक हेच माझ्यासाठी सर्वोच्च आहे,” असं ती म्हणाली.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची Mukta Barve ची पहिली प्रतिक्रिया देखील तितकीच साधी आणि सच्ची होती. “जेव्हा मला पुरस्काराबद्दल कळलं, तेव्हा मी विचारलं की तो कोणत्या कार्यासाठी दिला जातोय. त्यावर माझ्या विविध भूमिकांचा आणि केलेल्या कामांचा उल्लेख करण्यात आला. हे ऐकून मला समाधान वाटलं की, कोणीतरी हे सर्व लक्षात घेतलंय,” असं ती म्हणाली.
तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल विचारलं असता Mukta Barve म्हणाली, “मी सतत सगळीकडे दिसत नाही, पण निवडणारा माझं काम शोधतो आणि निवडतो. म्हणूनच मला असं वाटतं की, कामावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे.” Mukta Barve ने तीन नवीन चित्रपटांच्या कामाची माहितीही यावेळी दिली.
हे पण वाचा.. Rinku Rajguru चा अभिमानाचा क्षण; राज्य पुरस्कार जिंकून कृतज्ञतेने भरली पोस्ट
या पुरस्कारानं Mukta Barve यांचं आजवरचं सर्जनशील योगदान अधोरेखित झालं आहे. तिच्या अभिनयातील प्रामाणिकपणा, वैविध्यपूर्ण निवडी आणि कलात्मक दृष्टिकोनामुळे ती मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाची अभिनेत्री बनली आहे. आणि या सन्मानानं तिच्या त्या कलात्मक प्रवासाला मान्यता मिळालेली आहे.









