ADVERTISEMENT

Hruta Durgule भावनिक क्षण! सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्यावर शेअर केली मनमोकळी पोस्ट

Hruta Durgule 'अनन्या' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार जिंकत आपल्या अभिनय कारकिर्दीची प्रभावी सुरुवात केली आहे. या यशानंतर तिने सोशल मीडियावर खास पोस्ट करत पती प्रतीक शाहसह संपूर्ण टीमचे आभार मानले.
Hruta Durgule

मराठी मनोरंजन विश्वात आपल्या टेलिव्हिजन भूमिकांमधून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री Hruta Durgule आता चित्रपट सृष्टीतही आपल्या अभिनयाने लक्ष वेधून घेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ६०व्या आणि ६१व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात Hruta Durgule ला ‘अनन्या‘ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. या गौरवपूर्ण क्षणानंतर हृताने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Hruta Durgule ने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पुरस्कार स्वीकृतीचे काही खास क्षण शेअर करत लिहिले की, “मी कृतज्ञतेने भरून गेले आहे. ‘अनन्या’साठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. हे माझ्या करिअरमधील एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि मी यानंतरही मेहनतीने काम करत अर्थपूर्ण भूमिका निवडत राहीन.”

Hruta Durgule ने पोस्टमध्ये ‘अनन्या’चे दिग्दर्शक प्रताप फड यांचाही उल्लेख करत त्यांचे मनापासून आभार मानले. “तुम्ही मला या भूमिकेसाठी निवडलं, हे माझं भाग्य. तुमच्याशिवाय हे शक्य झालं नसतं. तुम्हाला मिळालेला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा दिग्दर्शक’ पुरस्कार मला तितकाच आनंद देणारा आहे. माझा प्रत्येक पुरस्कार मी तुम्हाला समर्पित करते,” असंही ती म्हणाली.

हे पण वाचा..Prajakta Gaikwad चा साखरपुडा ठरला खास! ‘S’ अक्षराने वाढवली उत्सुकता..

चित्रपटाचे निर्माते रवी जाधव यांनाही तिने खास धन्यवाद दिले. तसेच, तिच्या संपूर्ण टीमचे आणि कुटुंबियांचे आभार मानत तिने तिच्या पती प्रतीक शाहचा उल्लेख करत लिहिले, “तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून माझं जग अधिक सुंदर झालं आहे. तुझं असणं माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.”

Hruta Durgule च्या या पोस्टवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. अभिनेता ललित प्रभाकरने “ही तर फक्त सुरुवात आहे” म्हणत तिच्या यशाचे अभिनंदन केले. दिग्दर्शक रवी जाधव यांनी “अभिमानाचा क्षण” अशी प्रतिक्रिया दिली, तर सायली संजीव, आशुतोष गोखले, वैदही परशुरामी यांसारख्या अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या.

या पुरस्कार सोहळ्यात इतर कलाकारांनाही सन्मान मिळाले. महेश मांजरेकर यांना कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, मृण्मयी देशपांडेला सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार, आर्या आंबेकरला उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार तर रिंकू राजगुरूला उत्कृष्ट अभिनेत्रीचा कै. स्मिता पाटील पुरस्कार प्राप्त झाला.

हे पण वाचा..“Aastad Kale चा संतप्त सवाल: ‘Golden Quadrilateral’ म्हणवणाऱ्या घोडबंदर रस्त्याची अशी अवस्था का?”

Hruta Durgule च्या अभिनयातील नवे पर्व ‘अनन्या‘ पासून सुरु झाले असून लवकरच ती अभिनेता ललित प्रभाकरसोबत ‘आरपार‘ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hruta Durgule पोस्ट