ADVERTISEMENT

Shivani Rangole भावुक! ‘आम्ही सारे खवय्ये’च्या सेटवर आईची अनपेक्षित भेट, मृणाल कुलकर्णींचा किस्सा ऐकून तुम्हालाही येईल अश्रू

लोकप्रिय अभिनेत्री Shivani Rangole च्या आयुष्यातला एक खास क्षण ‘आम्ही सारे खवय्ये’च्या सेटवर घडला. आई राधा रांगोळेच्या अचानक भेटीमुळे भावनिक झालेल्या शिवानीचे अश्रू अनावर झाले. सासूबाई मृणाल कुलकर्णी यांनीही शेअर केला हा हृदयस्पर्शी अनुभव
Shivani Rangole

मराठी टेलिव्हिजनवर आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री Shivani Rangole पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण तिचा अभिनय नसून, एक खास आणि भावनिक प्रसंग आहे. ‘आम्ही सारे खवय्ये‘ या नव्या कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान तिची आई सेटवर अचानक पोहोचली आणि शिवानीला अश्रू अनावर झाले.

या कार्यक्रमात शिवानी तिच्या पतीसोबत, अभिनेता Virajas Kulkarni याच्यासोबत सहभागी होत आहे. एकत्र काही पदार्थ तयार करताना आणि खवय्यांसमोर सादर करताना ही जोडी प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार आहे. मात्र या प्रवासात घडलेला आईचा अनपेक्षित प्रवेश, शिवानीसाठी खास ठरला.

या भावनिक क्षणाबद्दल तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांनी ‘अल्ट्रा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “शिवानीची आई राधा कधीच तिच्यासोबत सेटवर गेलेली नाही. प्रत्येक वेळी ती नकार देत होती. पण यावेळी मी आग्रह केला. सर्वांना वाटलं मीच येणार, पण राधा आल्यावर सगळ्यांनाच आनंद झाला.”

हे पण वाचा..‘लाखात एक आमचा दादा’ फेम Disha Pardeshi निर्मिती क्षेत्रात; नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत!

आईला पाहताच Shivani Rangole चं मन भरून आलं. तिने रडायला सुरुवात केली आणि हा क्षण उपस्थित सर्वांसाठी भावनिक ठरला. राधा रांगोळे यांनी देखील यावेळी सांगितले की, “मी फारसं कधीच पुरस्कार सोहळ्यांनाही जात नाही. सेटवर जाणं तर दूरच. पण मृणालच्या आग्रहामुळे यावेळी गेले आणि मुलीच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले.”

Shivani Rangole आणि Virajas Kulkarni यांचा सहभाग असलेला ‘आम्ही सारे खवय्ये – जोडीचा मामला‘ हा कार्यक्रम ९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दर शनिवार आणि रविवार, दुपारी १ वाजता प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये या जोडीसह हेमंत ढोमे–क्षीती जोग, अभिजीत–सुखदा खांडकेकर, आणि मृण्मयी देशपांडे–स्वप्नील राव यांच्यासारख्या लोकप्रिय जोड्या दिसणार आहेत.

Shivani Rangole हिची करिअर सफर देखील लक्षवेधी आहे. ‘झी मराठी’वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा‘ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. यामध्ये अक्षरा ही भूमिका तिने साकारली होती आणि हृषिकेश शैलासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

हे पण वाचा.. मराठी सिनेमा Dashavatar’चा गूढतेने भरलेला भव्य टीझर प्रदर्शित; कलाकारांची अफाट मांदियाळी!

आता, आपल्या वैयक्तिक आयुष्यातील हृदयस्पर्शी क्षणामुळेही शिवानी पुन्हा एकदा चर्चेत आहे. आईचे प्रेम आणि सासरच्या घरातील पाठिंबा यामुळे तिच्या आयुष्याचा हा टप्पा खास ठरत आहे. ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना फक्त खाद्यपदार्थच नव्हे, तर अशा मनाला स्पर्श करणाऱ्या आठवणीही मिळणार आहेत.