ADVERTISEMENT

‘लाखात एक आमचा दादा’ फेम Disha Pardeshi निर्मिती क्षेत्रात; नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत!

'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्री Disha Pardeshi आता नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिच्या निर्मिती क्षेत्रातील पदार्पणाची चर्चा रंगली आहे.
Disha Pardeshi

मराठी मालिकांच्या दुनियेत अल्पावधीतच आपली खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री Disha Pardeshi आता अभिनयाच्या पलीकडे जाऊन एका नव्या प्रवासाची सुरुवात करत असल्याची चर्चा रंगली आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली दिशा आता निर्माता या नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

दिशा परदेशीने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ती एका शूटिंग सेटवर उभी असून तिच्या हातात ‘क्लॅप बोर्ड‘ दिसत आहे. विशेष म्हणजे त्या क्लॅप बोर्डवर “निर्मिती – दिशा परदेशी” असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, दिशा आता निर्माता म्हणून आपली इनिंग सुरू करत असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून Disha Pardeshi परदेशात असल्याचं तिच्या सोशल मीडियावरून स्पष्ट होत होतं. तिने विविध ठिकाणी केलेले प्रवास, तिथले फोटो आणि व्हिडीओ नियमितपणे शेअर करून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र, या नव्या प्रोजेक्टची माहिती फारशी उघड न करता तिने केवळ एक संकेत देत सस्पेन्स वाढवला आहे.

हे पण वाचा..मराठी सिनेमा Dashavatar’चा गूढतेने भरलेला भव्य टीझर प्रदर्शित; कलाकारांची अफाट मांदियाळी!

दिशा परदेशीने ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात भक्कम पाय रोवले. या मालिकेत तिच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना भुरळ घातली. ही तिची पहिलीच मालिका असली तरी तिने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्या यशानंतर दिशाने प्रकृतीच्या कारणास्तव ही मालिका सोडली, अशी माहिती तिने एका मुलाखतीत दिली होती. त्यावेळीच तिने लवकरच नव्या प्रोजेक्टसह परत येणार असल्याचं सांगितलं होतं.

‘लाखात एक आमचा दादा’ व्यतिरिक्त दिशाने ‘प्रेम पहिलं वहिलं‘ आणि ‘मन फकिरा‘ या मराठी चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘प्रेम पहिलं वहिलं’मध्ये ती अभिनेता संजय सेजवालच्या जोडीने झळकली होती, तर ‘मन फकिरा’ या चित्रपटात तिने पूजा सावंत आणि पुष्कर जोग यांच्यासोबत काम केलं होतं. या दोन्ही प्रोजेक्ट्समधून तिने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून अभिनयातील आपली ताकद सिद्ध केली आहे.

दिशाचा सोशल मीडियावरील प्रभाव देखील मोठा आहे. ती नेहमीच आपले विचार, अनुभव आणि प्रोफेशनल अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. त्यामुळे तिने शेअर केलेला हा ‘क्लॅप बोर्ड’चा फोटो काहीतरी मोठं आणि वेगळं सुचवतोय, हे नक्की.

हे पण वाचा..‘तारिणी’ मालिकेतील गोळीबाराचा थरारक अनुभव; स्वराज नागरगोजे म्हणतो, “१५ सेकंद सुन्न झालो होतो!”

सध्या मात्र दिशा परदेशीने स्वतःच्या निर्मिती संस्थेतून काहीतरी वेगळं साकारण्याचा निर्धार केलेला दिसतोय. या नव्या कलाकृतीविषयी अधिक माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचा कळस गाठलेला आहे.

Disha Pardeshi instagram post



मराठी इंडस्ट्रीमध्ये सध्या अनेक कलाकार निर्मितीच्या क्षेत्रात उतरलेले दिसतात. आता Disha Pardeshi सुद्धा त्या यादीत सामील होणार असल्याचे संकेत तिच्या या फोटोमधून मिळतात.

तिचा हा पुढचा प्रवास कसा असेल, ती कोणत्या विषयावर आधारित कलाकृती साकारते, यात कोणते कलाकार असतील—याबद्दल अधिकृत माहितीची सगळेच वाट पाहत आहेत. एक मात्र निश्चित, की Disha Pardeshi आता केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे, तर एक सशक्त निर्माता म्हणूनही नाव कमावण्याच्या तयारीत आहे!